Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनिल कपूर आणि माधुरी दीक्षितच्या 'टोटल धमाल'मधील लूकची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2018 17:15 IST

माधुरी दीक्षित आणि अनिक कपूर या लोकप्रिय जोडीचा फर्स्ट लूक समोर आला आहे. तब्बल 18 वर्षांनी ही जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र येणार आहे. 

मुंबई :  'टोटल धमाल' या सिनेमाचं शूटिंग सुरु झालं असून या सिनेमातील माधुरी दीक्षित आणि अनिक कपूर या लोकप्रिय जोडीचा फर्स्ट लूक समोर आला आहे. तब्बल 18 वर्षांनी ही जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र येणार आहे. 

इंद्र कुमार दिग्दर्शित या सिनेमाचं टायटल सॉंग नुकतंच शूट करण्यात करण्यात आलं. यावेळी अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित ही जोडी आधीसारखीच कमाल दिसत आहे. 

90च्या दशकात लाखो चाहत्यांना वेड लावणारी ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवण्यासाठी सज्ज झाली आहे. या फोटोत अनिल कपूर शानदार सूटमध्ये तर माधुरी लाल रंगाच्या गाऊनमध्ये झक्कास दिसत आहेत. 

अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित या सुपरहिट जोडीने 18 वर्षांआधी 'पुकार' या सिनेमात शेवटचं एकत्र काम केलं होतं. आता टोटल धमालसाठी इंद्र कुमार त्यांना एकत्र घेऊन आले आहेत. 7 डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

टॅग्स :बॉलिवूडमाधुरी दिक्षित