Join us
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी बाला ‘एनी’ने उडवली नोरा फतेहीची झोप ; फोटो पाहून तुम्हीही व्हाल घायाळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 08:00 IST

‘इश्क का राजा’ हा तिचा म्युझिक व्हिडीओही कमालीचा लोकप्रिय झाला होता. युट्युबवर सुमारे 21 कोटी लोकांनी तो पाहिला होता.

‘1921’ या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री एंजेला क्रिसलिंज्की हिची ‘पवन पूजा’ ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस आहे. ‘बंटी और बबली’ फेम शाद अली ही वेबसीरिज दिग्दर्शित करत आहेत. या वेबसीरिजशिवाय एंजेला तिचा ‘तेरा बदन’ या म्युझिक व्हिडीओमुळेही चर्चेत आहे. यापूर्वी ‘इश्क का राजा’ हा तिचा म्युझिक व्हिडीओही कमालीचा लोकप्रिय झाला होता. युट्युबवर सुमारे 21 कोटी लोकांनी तो पाहिला होता.

या म्युझिक व्हिडीओतील एंजेलाचा बेली डान्स चाहत्यांना भावला होता. यानंतर अनेकांनी एंजेलाची तुलना बेली डान्ससाठी प्रसिद्ध असलेली बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही हिच्याशी केली होती.  एंजेला एनी क्रिसलिंज्की नावानेही ओळखली जाते.

 

सध्या एंजेलाचे ताजे फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोतील एंजेलाच्या अदा वेड लावणा-या आहेत.

एंजेलाने 2015 मध्ये तेलगू चित्रपट ‘ज्योती लक्ष्मी’मध्ये आयटम सॉन्ग केले होते. 2017 मध्ये ‘रोग्य’ या कन्नड व तेलगू भाषेतील चित्रपटातून तिचा डेब्यू झाला होता.यानंतर साऊथच्या अनेक चित्रपटांत ती झकळली. यानंतर विक्रम भट स्टारर ‘1921’ या हॉरर चित्रपटात तिची वर्णी लागली. या चित्रपटात एंजेला निगेटीव्ह भूमिका साकारताना दिसली होती. तिने भूताची भूमिका साकारली होती.एंजेलाचे इन्स्टाग्राम अकाऊंट तिच्या हॉट, सेक्सी व बोल्ड फोटोंनी भरलेले आहेत. असेच तिचे काही फोटो...

टॅग्स :नोरा फतेही