Join us  

"आणि इथे शिल्पीचा प्रवास संपला...", धनश्रीचा 'तू चाल पुढं'च्या सेटवरील शेवटचा दिवस, शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 10:06 AM

Dhanashree Kadgaonkar : 'तू चाल पुढं' मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. दरम्यान आता धनश्री काडगावकर हिने तिचा सेटवरील शेवटच्या दिवसाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे तू चाल पुढं (Tu Chaal Pudha). या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले. या मालिकेतील अश्विनी या गृहिणीने प्रेक्षकांच्या मनात घर केले. ही भूमिका अभिनेत्री दीपा परब-चौधरी हिने साकारली आहे. तर या मालिकेत शिल्पीची निगेटिव्ह भूमिका अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने साकारली आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. दरम्यान आता धनश्रीने तिचा सेटवरील शेवटच्या दिवसाचा व्हिडीओ शेअर केला आहे. 

 २०२२ साली 'तू चालं पुढं' (Tu Chaal Pudha) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. धनश्री काडगावकर हिने इंस्टाग्रामवर तू चाल पुढं मालिकेच्या शूटिंगदरम्यानचा व्हिडीओ शेअर केला आहे. तिचा सेटवरचा शेवटचा दिवस आहे. या व्हिडीओत तिला पोलीस अटक करताना दिसत आहेत.  तिने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, आणि इथे शिल्पीचा प्रवास संपला... तिच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

प्रेक्षकांच्या प्रतिक्रियाएका युजरने लिहिले की, खूप उशीर केला तुला अटक करायला केव्हाच करायला पाहीजे होते. पण ऑल ओव्हर तुझी अकटिंग खरंच खूप भन्नाट तुझ्यामुळेच मालिका बघत होतो. दुसऱ्या युजरने लिहिले की, शाबास नाव कमवलंस तुझं काय होतंय हे बघायला मी सिरियल आता सिरियसली बघते. आणखी एकाने लिहिले की, आम्ही मालिकेला मिस करणार आहोत. खरेतर चांगली सुरू होती. दुसऱ्याने म्हटले की, कदाचित आश्विनीला खूप त्रास दिला म्हणून असेल. 

टॅग्स :धनश्री काडगावकर