Join us

"...आणि अखेर तो योग आलाच", महाकुंभमध्ये प्राजक्ता गायकवाडने त्रिवेणी संगमात केलं पवित्र स्नान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 11:01 IST

Prajakta Gaikwad : अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने शूटिंगमधून वेळ काढत प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळाव्यात सहभागी झाली आहे. तिथे तिने त्रिवेणी संगमात शाही स्नानदेखील केले.

प्रयागराज येथे महाकुंभ मेळावा सुरू असून यंदाचा हा कुंभमेळा आणखी खास आहे, कारण तो तब्बल १४४ वर्षांनी आला आहे. त्यामुळे केवळ देशातच नव्हे तर देशाविदेशातील सर्वसामान्यांपासून ते मोठमोठ्या दिग्गज व्यक्ती सुद्धा भारतात दाखल झाल्या आहेत. अनेक सेलिब्रिटी मंडळींनी सुद्धा या ठिकाणी जाऊन पवित्र स्नान केले आहे. दरम्यान आता मराठी कलाविश्वातील अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड देखील महाकुंभ येथे पोहचली आहे आणि तिने तिथे त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले आहे.

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने शूटिंगमधून वेळ काढत प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळाव्यात सहभागी झाली आहे. तिथे तिने त्रिवेणी संगमात शाही स्नानदेखील केले. तिने व्हिडीओ शेअर करत पोस्ट लिहिली आहे. तिने म्हटले की, शेड्युलमधून कसा वेळ मिळेल, कसं जाणं होईल, काहीच माहीत नव्हतं… पण १४४ वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्याला जायचं म्हणजे जायचं असं मनाशी ठरवलं होत… आणि अखेर तो योग आलाच…. "गंगा, यमुना,सरस्वती संगम". || धर्मो रक्षति रक्षितः ||

 प्राजक्ता गायकवाडने आतापर्यंत विविध मालिकांमध्ये काम केले आहे. 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. या मालिकेत प्राजक्ताने महाराणी येसूबाई ही भूमिका साकारली होती. याशिवाय तिने काही मालिका आणि सिनेमात तिने काम केले आहे.

टॅग्स :प्राजक्ता गायकवाडप्रयागराज