Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तेनाली रामा' मालिकेत अनंतलक्ष्‍मी व गोविंदुलु अडकतात एका खोलीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 16:56 IST

सोनी सबवरील मालिका 'तेनाली रामा'ची लोकप्रियता प्रेक्षकांमध्ये वाढतच आहे. मालिका आणि मालिकेमधील पात्रांना आकर्षक पटकथेमुळे अधिक पसंती मिळत आहे.

सोनी सबवरील मालिका 'तेनाली रामा'ची लोकप्रियता प्रेक्षकांमध्ये वाढतच आहे. मालिका आणि मालिकेमधील पात्रांना आकर्षक पटकथेमुळे अधिक पसंती मिळत आहे. आगामी एपिसोड मालिकेच्‍या ड्रामामध्‍ये अधिक रोमांचकपूर्ण घटनांची भर करतो. तथाचार्यची बहीण अनंतलक्ष्‍मी (चाहत मनी पांडे)गोविंदुलुसोबत (मेघान जाधव) जवळीक निर्माण करण्‍याच्‍या हेतूने रामाच्‍या (कृष्‍णा भारद्वाज) घरी येते.

तथाचार्य (पंकज बेरी) अनंतलक्ष्‍मीला सांगतो की, ती त्‍याच्‍या शत्रूकडून स्‍वयंपाक शिकू शकते, पण महाराणी तिरुमलम्‍बाकडून (प्रियंका सिंग) कधीच स्‍वयंपाक शिकू शकत नाही. तेव्‍हा ती रामाची पत्‍नी शारदाकडून (निया शर्मा) स्‍वयंपाक शिकण्‍याचे ठरवते. यामागे तिचा हेतू गोविंदुलुसोबत जवळीक साधूनत्‍याच्‍यासोबत नाते निर्माण करण्‍याचा असतो. ती राहण्‍यासाठी आणि तिला स्‍वयंपाक शिकवण्‍यासाठी अम्‍मा (निमिषा वखारिया) आणि शारदाची स्‍तुती करत त्‍यांना पटवते. या सर्व कृत्‍यांमागील तिचा मूळ हेतू रामाला समजतो. पण तथाचार्यला याबाबत समजते तेव्‍हा त्‍याला भिती वाटते की अनंतलक्ष्‍मीचारामासमोर टिकाव लागणार नाही. तो रामाला दरबाराच्‍या लेखाकार्यामध्‍ये गुंतवून ठेवण्‍याचा प्रयत्‍न करतो आणि त्‍याचवेळी अनंतलक्ष्‍मीला समजावयाला जातो. यादरम्‍यान रामा युक्‍तीने कामामधून वेळ काढत घरी जातो. तो गोविंदुलुला एका खोलीमध्‍ये बंद करतो आणि कुलुपाची चावी फेकून देतो. योगायोगानेअनंतलक्ष्‍मी देखील त्‍याच्‍यासोबत खोलीमध्‍ये बंद होते. तथाचार्यला अनंतलक्ष्‍मी व गोविंदुलुचे नाते मान्‍य होईल का? तो त्‍याच्‍या बहिणीला प्रेमापासून परावृत्‍त करेल का? हे पाहण्यासाठी मालिका पाहावी लागेल.या रोमांचपूर्ण एपिसोड आणि त्‍यामधील आपल्‍या भागाबाबत बोलताना चाहत मनी पांडे म्‍हणाली, 'मालिका तेनाली रामामध्‍ये अनंतलक्ष्‍मीची भूमिका साकारताना खूप मजा येत आहे. मुख्‍यत: आगामी एपिसोड खूपच विनोदी आहे. अनंतलक्ष्‍मी रामाच्‍या घरामध्‍ये जाऊन गोविंदुलुसोबत एका खोलीमध्‍ये बंदहोणार आहे आणि प्रेक्षकांना या गोंधळपूर्ण स्थितीचा आनंद घेता येणार आहे. या स्थितीचे निराकरण होते की नाही हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.'तथाचार्यची भूमिका साकारणारा पंकज बेरी म्‍हणाला,' आम्‍हाला तेनाली रामाच्‍या सेटवर कधीच कंटाळा येऊ शकत नाही. आगामी एपिसोड्स रामा व तथाचार्यमधील गोंधळासह निश्चितच प्रेक्षकांना अचंबित करणार आहेत. तथाचार्यला भिती असते की, रामाच्‍या चातुर्यासमोर त्‍याच्‍या बहीणीचा टिकाव राहणार नाही. तथाचार्य यामधून मार्ग काढतो का की नाही हे प्रेक्षकांना नक्‍कीच पाहायला आवडेल.' 

टॅग्स :तेनाली रामासोनी सब