Join us

आनंदी गोपाळ फेम अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद सध्या काय करतेय, जाणून घ्या तिच्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 13:39 IST

अभिनयाच्या कौशल्यासह आपल्या अंगभूत कलांनी विविध कलाकार आपलं वेगळेपण जपतात.

अभिनयाच्या कौशल्यासह आपल्या अंगभूत कलांनी विविध कलाकार आपलं वेगळेपण जपतात. त्याच यादीत भाग्यश्री मिलिंदचे नाव सामिल आहे. भाग्यश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे मल्लखांब करतानाचे व्हिडीओ काही दिवसांपूर्वी शेअर केले आहे. या व्हिडीओमध्ये भाग्यश्री मल्लखांबचा सराव करताना दिसत आहे.

या व्हिडीओला तिने बिस्ट मोड असे कॅप्शनही दिले आहे. भाग्यश्रीचा हा व्हिडीओ अनेक चाहत्यांसाठी प्रेरणादायी ठरणार हे मात्र नक्की. भाग्यश्री  आपल्या फिटनेसमुळे अनेकांना टक्कर देते. भाग्यश्रीचा आपल्या फिटनेसच्या दिनचर्येकडे बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही. अभिनयबरोबच तिला फिटनेसचेही वेड असल्याचे समोर आले आहे.भाग्यश्रीच्या चाहत्यांनी तिच्या या व्हिडीओ लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला होता.  

आनंदी गोपाळ या सिनेमामध्ये डॉ. आनंदीबाईंची भूमिका भाग्यश्री मिलिंदने साकारली होती. तिने साकारलेल्या या भूमिकेचे फार कौतुकदेखील झाले होते.  भाग्यश्रीने यापूर्वी २०१३ मध्ये आलेल्या बालक पालक सिनेमात मुख्य भूमिकेत होती. भाग्यश्रीने आजपर्यंत वेगवेगळ्या थाटणीच्या सिनेमात काम केलं आहे. भाग्यश्रीने मुंबईतल्या डहाणूकर कॉलेजमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. 

टॅग्स :भाग्यश्री मिलिंद