Join us
Daily Top 2Weekly Top 5

काम करण्याची हिंमत वाढवणारा पुरस्कार; लोकमतच्या व्यासपीठावर जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना ज्येष्ठ अभिनेेते अशोक सराफ झाले भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 10:38 IST

मंगळवारी ज्येष्ठ चित्रपट अभिनेेते अशोक सराफ यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२६ जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

मुंबई : मला आणखी एक जीवनगौरव पुरस्कार मिळतोय. हा नुसता पुरस्कार नाही, तर ही माझी काम करण्याची हिंमत वाढवणारा गौरव आहे, अशी अत्यंत नम्र भावना ज्येष्ठ चित्रपट अभिनेेते अशोक सराफ यांनी व्यक्त केली. 

मंगळवारी त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२६ जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी उपस्थितांनी उभे राहून त्यांच्या कारकीर्दीला मानवंदना दिली.

मी फक्त दोनच शब्द बोलेन. धन्यवाद... धन्यवाद. हा पुरस्कार मिळवण्यासाठी मी एकटा जबाबदार नाही. समोर बसलेले तुम्ही असंख्य प्रेक्षक, माझ्याबरोबरचे सहकलाकार, काम करणारे आणि माझ्याबद्दल सदिच्छा बाळगणारे लोक हे सतत पाठीशी असल्याने माझ्याकडून हे काम झाले. मी केले असे कधीही म्हणणार नाही. त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा अतिशय आभारी आहे.      - अशोक सराफ, ज्येष्ठ चित्रपट अभिनेेते 

आता एक शोकेस द्यायला हवे

याच कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक सराफ यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, अशोक सराफ यांना आतापर्यंत बरेच मोठे पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळे त्यांना आता पुरस्कार ठेवण्यासाठी शोकेस द्यायला हवे. 

‘लोकमत’चे मानले आभार 

लोकमत या वर्तमानपत्राचा मी आभारी आहे. त्यांनी मला पुरस्कारासाठी पात्र समजले. दर्डा कुटुंबाचा मी कायम ऋणी राहीन, अशा शब्दांत अशोक सराफ यांनी ‘लोकमत’चे आभार मानले.

गायक शान यांचा नशिला अंदाज

अशोक सराफ यांच्यासाठी प्रसिद्ध गायक शान यांनी मराठीत दोन ओळी गायला हव्या, असे यावेळी लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी सुचविले. त्यावर शान म्हणाले, तुमचे ते गीत मी नेहमी गातो. ‘अश्विनी ये ना... प्रिये... जगू कसा तुझ्या विना मी गं राणी गं... कशी ही जिंदगीत आणीबाणी गं... ये ना प्रिये... मी तर प्रेम दिवाना रसिला... दे प्यार जरासा नशिला...’ हे गाणं म्हटल्यानंतर त्याला निवेदिता व अशोक सराफ यांच्यासह व्यासपीठावरील सर्वांनी मनमुराद दाद दिली. उपस्थितांनीही टाळ्यांचा वर्षाव केला.

आप सब के नाम की ये खूबसूरत शाम हो जाये... 

या पुरस्काराची भूमिका मांडताना लोकमत समूहाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा म्हणाले की, नव्या पिढीतूनही आदर्श निर्माण होण्यासाठी ‘लोकमत’ने समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्याचा उपक्रम सातत्याने राबवत आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत वाटा उचलणाऱ्या विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींना प्रकाशझोतात आणण्याचे काम ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराच्या माध्यमातून केले जाते. या पुरस्काराचे यंदाचे बारावे वर्ष आहे. या पुरस्काराचे महत्त्व केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात निर्माण झाले आहे. लोकमतने गौरविलेल्या अनेक व्यक्तींनी पुढे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे यश संपादन केले आहे. विकासाच्या दृष्टीने विचारांची देवाणघेवाण होणे हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे, असे सांगून त्यांनी एक शेर सादर केला. 

हमारा दिल एक खिलता हुआ गुलाब हो जायेचिरागो की तरह आंखे जले जब शाम हो जायेआज चांद भी इस मोहब्बत का गवाह हो जायेआप सब के नाम की ये खूबसूरत शाम हो जायेउजाले अपने यादों के हमारे साथ रहने दोन जाने किस गली मे जिंदगी की शाम हो जाये...

English
हिंदी सारांश
Web Title : Ashok Saraf Honored with Lifetime Achievement Award, Expresses Gratitude

Web Summary : Veteran actor Ashok Saraf received the Lokmat Maharashtrian of the Year Lifetime Achievement Award, expressing it fuels his passion. He humbly thanked his colleagues, audience, and well-wishers. Deputy CM Eknath Shinde congratulated Saraf, joking about needing a showcase for his awards. Saraf expressed gratitude to Lokmat and the Darda family.
टॅग्स :अशोक सराफलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2026