Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाआधी आई बनणार ‘ही’ अभिनेत्री, शेअर केला टॉपलेस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 10:22 IST

गेल्या काही दिवसांपासून  तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चा सगळीकडेच सुरू आहेत. याचे कारण म्हणजे,  प्रेग्नंसीकाळातील बिनधास्त फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्याचा सपाटा तिने लावला आहे.

ठळक मुद्दे  एमी जॅक्सन मागील वर्षी रजनीकांतच्या ‘2.0’ मध्ये दिसली होती.  

बॉलिवूड अभिनेत्री एमी जॅक्सन लवकरच आई होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून  तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चा सगळीकडेच सुरू आहेत. याचे कारण म्हणजे,  प्रेग्नंसीकाळातील बिनधास्त फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्याचा सपाटा तिने लावला आहे. आता तर एमीने चक्क बेबी बम्प फ्लॉन्ट करणारा टॉपलेस फोटो शेअर केला आहे. सोबत स्वत:चे हेल्थ अपडेटही दिले आहेत.प्रेग्नंसीच्या 33 व्या आठवड्यात शरीरात कुठले बदल झालेत, हे तिने सांगितले आहे. टॉपलेस या फोटोत एमीने एक मोठी हॅट घातली आहे. हा फोटो शेअर करताना तिने लिहिले, ‘ग्रीस? नाही. मी आणि माझ्या बाळाने संपूर्ण उन्हाळा बगिच्याच्या मागे काढला. त्याची एक झलक पाहण्याची प्रतीक्षा आहे. हा प्रेग्नंसीचा 33 वा आठवडा आहे. बम्प, स्ट्रेच मार्क, वेट गेन हे सगळे या काळात पाहायला मिळाले.’

एमीने शेअर केलेला हा फोटो आणि त्याला दिलेले कॅप्शन वाचून एमी तिच्या बाळाच्या आगमनासाठी किती आतूर आहे, याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल. सध्या एमीचे प्रेग्नंसीदरम्यानचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. 

 यावर्षी नवीन वर्षांच्या संध्येला बॉयफ्रेन्ड जॉर्जसोबत एमीने साखरपुडा केला होता. त्यावेळी ती दोन महिन्यांची प्रेगनंन्ट होती. बाळाच्या जन्मानंतर पुढच्या वर्षी म्हणजे २०२० मध्ये एमी व जॉर्ज लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे.  

जॉर्जचा ‘क्वीन सिटी’ नामक एक अलिशान नाईटक्लब आहे. एमीला डेट करण्यापूर्वी जॉर्ज पॉप गायिका शेरिल कोलला डेट करत होता. पण कालांतराने दोघांचेही ब्रेकअप झाले आणि जॉर्जला एमी मिळाली.

  एमी जॅक्सन मागील वर्षी रजनीकांतच्या ‘2.0’ मध्ये दिसली होती.  एमीने ‘एक दिवाना था’ या सिनेमातून आपल्या बॉलिवूड करिअरची सुरूवात केली होती.

टॅग्स :एमी जॅक्सन