बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा हंगाम सुरु आहे. प्रियांका चोप्रा, दीपिका पादुकोण यांच्यासह अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले आहेत. नव्या वर्षांत बॉलिवूडची आणखी एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे. होय, या अभिनेत्रीचे नाव आहे, एमी जॅक्सन. ब्रिटीश ब्युटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या एमी जॅक्सनने नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रियकर जॉर्ज पानायिटूसोबत साखरपुडा केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून एमीने ही खुशखबर चाहत्यांशी शेअर केली आहे. ‘१ जानेवारी २०१९, एका नव्या प्रवासाचा शुभारंभ...आय लव्ह यू. मला जगातील सर्वात नशिबवान मुलगी बनवण्यासाठी आभार...’, असे एमीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. शिवाय या पोस्टमध्ये अंगठीचा इमोटिकॉनही शेअर केला आहे.
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी एमी जॅक्सनने अब्जाधीश प्रियकराशी केला साखरपुडा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 13:26 IST
बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा हंगाम सुरु आहे. प्रियांका चोप्रा, दीपिका पादुकोण यांच्यासह अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले आहेत. नव्या वर्षांत बॉलिवूडची आणखी एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे. होय, या अभिनेत्रीचे नाव आहे, एमी जॅक्सन.
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी एमी जॅक्सनने अब्जाधीश प्रियकराशी केला साखरपुडा!!
ठळक मुद्दे एकेकाळी एमी व प्रतीक बब्बर यांच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. सलमान खानसोबतही तिचे नाव जोडले गेले होते. अर्थात २०१२ मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले होते. एमीने २०१२ मध्ये ‘एक दिवाना था’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.