Join us
Daily Top 2Weekly Top 5

व्हॅकेशनसाठी नाही तर या कारणासाठी अमृता गेलीय बल्गेरियाला, करणार मोठे-मोठे कारनामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 19:54 IST

हिंदी व मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयानं सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह असते.

हिंदी व मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयानं सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह असते.  अमृता 'खतरों के खिलाडी १०'मध्ये दिसणार आहे.  या शोचे अँकरींग दिग्दर्शक रोहित शेट्टी करणार आहे. या शोच्या शूटिंगला लवकरच सुरूवात होणार आहे. या शोमध्ये सहभागी होणारे सेलिब्रेटीज शुटिंगसाठी जाण्यासाठी रवाना झाले आहेत. हे खुद्द अमृताने इंस्टा स्टोरीच्या माध्यमातून सांगितलं आहे. 

रोहित शेट्टीचा एडव्हेंचर रिएलिटी शो खतरों के खिलाडी १० च्या शूटिंगला सुरूवात होणार असून या शोमध्ये १४ सेलिब्रेटीज बल्गेरियाला पोहचले आहेत. खतरों के खिलाडीमध्ये करण पटेल, अदा खान, करिश्मा तन्ना, आर जे मलिश्का, कोरियोग्राफर धर्मेश व काही सेलिब्रेटी दिसणार आहेत. १ ऑगस्टला सर्व सेलिब्रेटी बल्गेरियाला रवाना झाले. या सेलिब्रेटींनी ही माहिती आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावर दिली आहे.

अमृताने देखील तिच्या चाहत्यांना ही माहिती देत व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ शेअर करून तिने लिहिलं की, नवीन एडव्हेंचर प्रोजेक्टासाठी तयारी करत आहे. यावेळेस एडव्हेंचरसाठी ताकद व मेंटली आणि शारिरीक ताकदीची गरज आहे. त्यासाठी मी काय तयारी केली आहे, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा.

खतरों के खिलाडी सीझन १० शूटिंगसाठी १ महिना बल्गेरियाला गेले आहेत. यंदादेखील दिग्दर्शक रोहित शेट्टी सूत्रसंचालन करणार आहे. सेलिब्रेटींनी एअरपोर्टवर मस्ती करतानाचे फोटो शेअर केला आहेत.

या शोच्या चित्रीकरणाला काही दिवसात सुरूवात होईल. मात्र हा शो पाहण्यासाठी चाहत्यांना २०२० पर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.

खतरों के खिलाडी १८ जानेवारी पासून सलमान खानचा बिग बॉसचा तेरावा सीझन संपल्यानंतर प्रसारीत होईल.

टॅग्स :अमृता खानविलकरआर जे मलिष्कारोहित शेट्टी