Join us

अमृता खानविलकरला लागली मोठी लॉटरी, हाती लागला मोठा प्रोजेक्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 12:22 IST

Amruta Khanvilkar: मराठी चित्रपटसृष्टीतील चंद्रा म्हणजेच अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या डान्स रिएलिटी शो झलक दिखला जामध्ये पाहायला मिळते आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील चंद्रा म्हणजेच अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिने मराठी सिनेमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. तसेच तिने राझी, मलंग या हिंदी चित्रपटातही आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. सध्या ती छोट्या पडद्यावरील डान्स रिएलिटी शो झलक दिखला जामध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. दरम्यान आता अभिनेत्रीच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. अमृताला मोठी लॉटरी लागली असून तिच्या हाती मोठा प्रोजेक्ट लागला आहे. 

अमृता खानविलकरने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. तिने लिहिले की, दिग्गज हंसल मेहता दिग्दर्शित लोभ, जीवन आणि दहशत, अराजकतेची कथा असलेला लूटेरे लवकरच येत आहे. फर्स्ट लूक. 

अमृता खानविलकर हॉटस्टारवरील लूटेरे या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. याचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज झाला. त्यात अमृताची छोटीशी झलक पाहायला मिळाली. तिच्या या पोस्टवर सेलिब्रेटींसह चाहते शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.

लूटेरेची कथा सत्य घटनेवर प्रेरीत काल्पनिक थ्रिलर ड्रामा आहे. ही एका मोठ्या कमर्शियल भारतीय जहाजाची कथा आहे. ज्याचे सोमालियच्या तटावरून अपहरण केले जाते. इथूनच सीरिजच्या कथेला सुरूवात होते. या सीरिजची शूटिंग युक्रेन, केप टाऊन आणि दिल्लीमध्ये करण्यात आली आहे. अमृता व्यतिरिक्त या सीरिजमध्ये रजत कपूर मुख्य भूमिकेत आहेत.

टॅग्स :अमृता खानविलकरहंसल मेहता