Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मला तुझा गर्व आहे", अमृता खानविलकरच्या वाढदिवशी पतीची खास पोस्ट, चंद्रमुखी कमेंट करत म्हणाली- "तुझ्याशिवाय..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 09:37 IST

मराठी सिनेसृष्टीची चंद्रमुखी म्हणजेच अमृता खानविलकरचा आज वाढदिवस आहे. अमृताच्या वाढदिवशी तिचा पती हिमांशू मल्होत्राने खास पोस्ट केली आहे. 

मराठी सिनेसृष्टीची चंद्रमुखी म्हणजेच अमृता खानविलकरचा आज वाढदिवस आहे. अमृताने तिच्या अभिनयाने सिनेसृष्टीत स्वत:चं स्थान निर्माण केलं. पदार्पणातच अपयश हाती आलेल्या अमृताने केवळ मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीही गाजवली. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका साकारताना अमृता दिसली. अभिनयाबरोबरच तिच्या नृत्याचेही चाहते फिदा आहेत. आज अमृताच्या वाढदिवशी तिचा पती हिमांशू मल्होत्राने खास पोस्ट केली आहे. 

अभिनेता हिमांशूने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. अमृताबरोबरचे काही फोटो त्याने शेअर केले आहेत. पोस्ट लिहित हिमांशूने अमृताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "हॅपी बर्थडे अमू. माझ्या प्रेमाच्या शुभेच्छा नेहमी असतील आणि त्या इन्फिनिटीपर्यंत वाढत जातील. तू जसजशी प्रगती करत आहेस, तशी चमकत आहेस. मला तुझा गर्व आहे आणि नेहमीच असेल. ढेर सारा प्यार", असं कॅप्शन हिमांशूने या पोस्टला दिलं आहे. हिमांशूच्या या पोस्टवर अमृताने कमेंट केली आहे. "तुझ्याशिवाय मी माझ्या आयुष्याचा विचारही करू शकत नाही. तुझा सपोर्ट आणि फक्त तू", असं अमृताने म्हटलं आहे. 

अमृताने 'गोलमाल' या मराठी सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'साडे माडे तीन', 'फक्त लढ म्हणा', 'नटरंग', 'कट्यार काळजात घुसली', 'चंद्रमुखी' अशा सिनेमांमधून तिने अभिनयाच्या छटा दाखवल्या. 'राझी', 'सत्यमेव जयते', 'रंगून' अशा हिंदी सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे. अनेक रिएलिटी शोमध्येही तिने सहभाग घेतला होता. २०१५ साली अमृताने अभिनेता हिमांशूसोबत लग्नगाठ बांधली. 

टॅग्स :अमृता खानविलकरसेलिब्रिटी