Join us

अमृता खानविलकर लवकरच चाहत्यांना देणार गुड न्यूज, वाचून व्हाल खुश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 15:09 IST

सध्या अमृता 'पाँडिचेरी' या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. मात्र आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमृताकडे चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे.

ठळक मुद्देअमृता 'पाँडिचेरी' या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्रअमृता खानविलकर दिसणार हिंदी सिनेमात

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने आपल्या अभिनय कौशल्याने मराठी प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. तसेच 'राझी' व 'सत्यमेव जयते' या हिंदी चित्रपटातूनही तिने रसिकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. सध्या ती 'पाँडिचेरी' या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. मात्र आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमृताकडे चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. काय असेल ही खुशखबर जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना... अमृताने 'राझी' व 'सत्यमेव जयते' या हिंदी चित्रपटात झळकल्यानंतर आता आणखीन एक हिंदी सिनेमात काम करण्याची संधी मिळाल्याचे समजते आहे.

अमृताने 'राझी'मध्ये साकारलेल्या मुनीराच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते. त्यानंतर सत्यमेव जयते चित्रपटात मनोज वाजपेयीच्या पत्नीची भूमिका अमृताने केली होती. ही भूमिका देखील प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

त्यानंतर आता ती आणखीन एका हिंदी सिनेमात झळकणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. मात्र ती कोणत्या चित्रपटात किंवा कोणत्या दिग्दर्शकासोबत वा कोणत्या भूमिकेत दिसणार आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. त्यामुळे या चित्रपटाबाबत अमृता कधी घोषणा करणार, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

सध्या अमृता 'पाँडिचेरी' चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ती दिग्दर्शक सचिन कुंडलकर सोबत पहिल्यांदाच काम करणार आहे.

शीर्षकावरुनच हा सिनेमा कथा पॉण्डेचेरीशी संबंधित असणार आहे. खुद्द सचिनने या गोष्टीला दुजोरा दिला आहे. हा सिनेमा पूर्णपणे स्मार्टफोनवर चित्रीत करण्यात येणार आहे.  

टॅग्स :अमृता खानविलकरसचिन कुंडलकर