Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमिताभ बच्चन यांना ठग्सच्या शूटिंगनंतर सुरु झाला 'हा' त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 12:10 IST

‘आझाद’च्या रूपात अमिताभ बच्चन यांचा जबरदस्त अ‍ॅक्शन अवतार दिसतो. तो पाहून अंगावर शहारे येतात. या आझादला पकडणार इंग्रजांना आझादसारखाचं बहादूर ठग हवा असतो.

ठळक मुद्देआझादची भूमिका साकारताना अमिताभ यांच्यासाठी लोखंडाचे कवच बनवण्यात आले होतेहा सिनेमा येत्या ९ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  

 अमिताभ बच्चन  आणि आमिर खान यांची प्रमुख भूमिका असलेला ठग्स ऑफ हिंदोस्तानचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. ‘आझाद’च्या रूपात अमिताभ बच्चन यांचा जबरदस्त अ‍ॅक्शन अवतार दिसतो. तो पाहून अंगावर शहारे येतात. या आझादला पकडणार इंग्रजांना आझादसारखाचं बहादूर ठग हवा असतो. ही भूमिका साकारताना अमिताभ यांनी अनेक स्टंट केले. शूटिंग दरम्यान झालेल्या पाठदुखीच्या तक्रारीमुळे त्यांना अनेक वेळा रुग्णालयात जावे लागले. आझाद यांची भूमिका साकारताना अमिताभ यांच्यासाठी लोखंडाचे कवच बनवण्यात आले होते. मात्र त्यानंतर ते लेदरचे करण्यात आले. लेदर आर्मचे वजनही जवळपास 30 ते 40 किलो होतो त्यामुळे ते घालताना ही त्यांना अडचणी येत होत्या. याचा त्यांना बराच त्रास झाला. 

यात आमिर खान एका ‘फिरंगी’च्या रूपात आहे. अमिताभ यांनी खुदाबक्श नावाचे पात्र साकारले असून कॅटरिना कैफ हिने सुरैयाचे तर फातिमा सना शेख हिने जाफिराची भूमिका साकारली आहे.

'ठग्स आॅफ हिंदोस्तान' हा सिनेमा विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित केला आहे. या सिनेमाच्या निर्मात्यांनी या सिनेमाच्या निर्मितीत कोणतीही कसर शिल्लक राहू नये याची काळजी घेतली आहे. या सिनेमाच्या आऊटडोअर चित्रीकरणासाठी निर्मात्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला असल्याची चर्चा आहे. या सिनेमाच्या काही दृश्यांचे चित्रीकरण माल्टा येथे करण्यात आले होते.  गेम्स ऑफ थ्रोन्स या प्रसिद्ध कार्यक्रमाचे चित्रीकरण ज्या समुद्रकिनारी झाले, तिथेच या सिनेमाचे चित्रीकरण करण्यात आले आहे.  हा सिनेमा येत्या ९ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  

टॅग्स :ठग्स आॅफ हिंदोस्तानअमिताभ बच्चन