Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘सिलसिला’ पाहून भडकले होते अमिताभ बच्चन, काय होते कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 17:09 IST

‘सिलसिला’ तयार होत असताना यश चोप्रा कधी नव्हे इतके तणावातून गेलेत. अगदी...

ठळक मुद्दे‘सिलसिला’ रिलीज झाल्यानंतर एका मुलाखतीत यश चोप्रा यांनी अमिताभ यांच्यावर टीका केली होती.

‘सिलसिला’ या सिनेमात अमिताभ बच्चनरेखा यांचा अखेरचा ऑनस्क्रीन  रोमान्स पाहायला मिळाला होता. या सिनेमाच्या रिलीजला नुकतेच 39 वर्षे पूर्ण झालीत. अमिताभ, रेखा आणि जया बच्चन यात लीड रोलमध्ये होते. दिग्दर्शक व निर्माते यश चोप्रांचा हा सिनेमा त्यावेळी फ्लॉप झाला होता. या सिनेमामुळे अमिताभ व यश चोप्रा यांच्यात मतभेदही निर्माण झाले होते.

फार क्वचित लोकांना ठाऊक असेल की, या सिनेमासाठी आधी स्मिता पाटील व परवीन बाबी यांची निवड झाली होती. मात्र ऐनवेळी या दोघींना हटवून रेखा व जया यांची वर्णी लागली होती. यामुळे स्मिता पाटील यश चोप्रा यांच्यावर अनेकदिवस नाराज होत्या. यश चोप्रा यांनी एका मुलाखतीत याबद्दल सांगितले होते.

‘सिलसिला’च्या सेटवर अनेक गोष्टी घडल्या होत्या. अमिताभ, रेखा आणि जया एकत्र म्हटल्यावर सेटवरचे वातावरण नेहमीच स्फोटक असायचे. अगदी कधी भडका उडेल, याचा नेम नव्हता.

रेखा तर सेटवर आल्या की, थेट सिनेमेटोग्राफर केजीच्या कानात कुजबुजायच्या म्हणे. फर्स्ट टेक हाच फायनल टेक असेल. शॉट मिळाला तर ठीक, नाही मिळाला तर ठिक. मी कट म्हणताच निघून जाईल, असे त्या केजींना आधीच सांगायच्या.

‘सिलसिला’ तयार होत असताना यश चोप्रा कधी नव्हे इतके तणावातून गेलेत. अगदी चित्रपटाच्या शेवटच्या दिवसांपर्यंत ते तणावात होते.

कसाबसा चित्रपट तयार झाला आणि रिलीज झाला. पण सिनेमा पाहून अमिताभ यश चोप्रांवर जबरदस्त भडकले होते. त्यांना हा सिनेमा जराही आवडला नव्हता. त्यातच सिनेमा बॉक्सआॅफिसवर फ्लॉप झाला. या सिनेमामुळे अमिताभ व यश चोप्रा यांच्या नात्यात कटुता आल्याचे मानले जाते.

‘सिलसिला’ रिलीज झाल्यानंतर एका मुलाखतीत यश चोप्रा यांनी अमिताभ यांच्यावर टीका केली होती. अमिताभ आपल्या कामाप्रति फार प्रामाणिक नाहीत, असे ते म्हणाले होते. यामुळे अमिताभ जाम भडकले होते. यानंतर अमिताभ यांनी जवळपास 19 वर्षे यश चोप्रांसोबत कोणताही सिनेमा केला नव्हता. मात्र 2000 साली ते यशराजच्या ‘मोहब्बतें’मध्ये दिसले होते.

टॅग्स :अमिताभ बच्चनरेखा