बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्याचे केवळ भारतातच नाही तर जगभरात असंख्य चाहते आहेत. अमिताभ बच्चन केवळ अभिनेते म्हणूनच नाही, तर चांगल्या सिनेमांचे आणि कलेचे अस्सल जाणकार म्हणूनही ओळखले जातात. अमिताभ यांनी नुकतंच एक खास चित्रपट पाहिला आणि तो पाहताच ते प्रभावित झाला. अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या जवळच्या व्यक्तीचा आहे.
२०२५ सालचा हा एक चित्रपट सध्या ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाचं नाव आहे 'कालीधर लापता'. या सिनेमात अमिताभ बच्चन यांचा लेक अभिषेक बच्चन मुख्य भुमिकेत आहे. त्याच्यासोबत मोहम्मद झीशान अय्युब, निमरत कौर आणि अभिषेक झा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.या चित्रपटाचं दिग्दर्शन मधुमिता यांनी केलं असून कथा अमितोष नागपाल आणि मधुमिता यांनी एकत्र लिहिली आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
अमिताभ बच्चन यांनीही या चित्रपटाचं कौतुक केलं असून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिषेक बच्चनच्या अभिनयाची प्रशंसा केली आहे. अमिताभ यांनी पोस्ट शेअर करत लिहलं, "अभिषेक आणि कालीधर लापता या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होतोय. हे पाहून माझ्या मुलासाठी माझे मन आणि हृदय अभिमानाने भरून आलंय". यासोबतच अमिताभ यांनी चित्रपटासंदर्भातील विविध पोस्ट शेअर केल्या आहेत.
कथेच्या केंद्रस्थानी आहे 'कालिधर' नावाचा एक माणूस, जो अल्झायमर आजाराने त्रस्त आहे. त्याने आपल्या लहान भावंडांसाठी आयुष्य खर्च केलं, पण त्याच भावंडांनी नंतर त्याला कुंभमेळ्यात टाकून दिलं. यानंतर त्याची भेट होते ८ वर्षांच्या अनाथ बल्लूशी आणि त्याच्यामुळे कालिधरचं जीवन नव्याने सुरू होतं. हा चित्रपट ४ जुलै २०२५ रोजी ZEE5 वर प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवसापासून ट्रेंडिंग लिस्टमध्ये आहे. सध्या तो देशभरात टॉप १० ओटीटी चित्रपटांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. IMDb वर याला १० पैकी ८.३ रेटिंग मिळालं आहे.