Join us

वयाच्या 44 व्या वर्षी अमिषा पटेलने तोडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा, व्हायरल फोटो बघून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 19:15 IST

कहो ना प्यार है’ सिनेमातून अमिषा पटेलने दणक्यात रूपेरी पडद्यावर हृतिकसह एंट्री घेतली होता. हृतिक रोशन आणि अमिषा या ...

कहो ना प्यार है’ सिनेमातून अमिषा पटेलने दणक्यात रूपेरी पडद्यावर हृतिकसह एंट्री घेतली होता. हृतिक रोशन आणि अमिषा या दोघांचाही हा पहिला सिनेमा होता. पदार्पणाच्या सिनेमातच दोघांनाही सुपरडुपर यश मिळाले आणि हा सिनेमाही सुपरहिट ठरला होता. अमिषाच्या भूमिकेचे देखील विशेष कौतुक करण्यात आले होते. अमिषा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.

ती तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडीओमुळे चर्चेत असते. या व्हिडीओमध्ये अमिषाने 44 व्या वर्षी हॉटनेसच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. आपल्या बाल्कनीत पोझ देताना दिसतेय. अमिषाचे हे फोटो आणि व्हिडीओ बघून फॅन्स क्रेझी झालेत. 

अमिषाला कहो ना प्यार है आणि गदर एक प्रेमकथा या चित्रपटांना चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. पण या चित्रपटांमुळे मिळालेले स्टारडम तिला सांभाळता आले नाही. त्याकाळात अमिषाने ‘सिलेक्टीव्ह’ होण्याऐवजी एकापाठोपाठ एक डझनभर सिनेमे साईन केलेत.

यातले बहुतेक सिनेमे आपटले. अमिषा चित्रपटात काम करत नसली तरी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे ग्लॅमरस आणि हॉट अंदाजातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. बिग बॉस 13 मध्ये ‘घराची मालकीण’ म्हणून ती काही महिन्यांपूर्वी दिसली होती. पण तिचा बिग बॉसमधील वावर प्रेक्षकांना आवडला नाही.

  .

टॅग्स :अमिषा पटेल