Join us
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या ४८ व्या वर्षी प्रसिद्ध गायिकेने घेतला जगाचा निरोप,नैराश्यातून उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 11:35 IST

काही दिवसांपूर्वी नैराश्यातून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्या कोमात गेल्या होत्या.

अमेरिकन गायिका आणि गीतकार कोको ली यांचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या 48 वर्षीय त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. कोको ली यांनी काही दिवसांपूर्वी नैराश्यातून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्या कोमात गेल्या होत्या. कोको ली यांच्या मृत्यूची माहिती त्यांची बहिणी कॅरोल आणि नॅन्सी ली यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.

कोको ली यांचा जन्म हाँगकाँगमध्ये झाला आणि सध्या त्या तिथेच राहत होत्या. कोको ली यांनी तिथल्या क्वीन मेरी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. बहिणींनी फेसबुक आणि इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'कोकोने नैराश्याशी लढण्यासाठी अनेक डॉक्टर आणि प्रोफशनल व्यक्तींची मदत घेतली होती. तिने यातून बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न केला.

2 जुलै रोजी कोको लीने घरी आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या टीमने त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. ५ जुलैला त्यांनी जगाचा निरोप घेतला.

कोको ली 30 वर्षांपासून संगीत क्षेत्रात कार्यरत होत्या. अ लव्ह बिफोर टाइम या ऑस्कर नामांकित गाण्यावरही त्यांनी परफॉर्म केले. 1975 मध्ये हाँगकाँगमध्ये जन्मलेले कोको ली कुटुंबात सर्वात लहान होत्या. त्यांच्या जन्मापूर्वीच वडिलांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर आई त्यांना आणि इतर दोन मुलींना घेऊन प्रथम अमेरिका आणि नंतर सॅन फ्रान्सिस्कोला गेल्या. 1992 मध्ये ग्रॅज्युएशननंतर, कोको ली यांना हाँगकाँगमधील कॅपिटल आर्टिस्ट्ससोबत रेकॉर्डिंग कराराची ऑफर देण्यात आली. असंख्य आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. 

टॅग्स :हॉलिवूड