Join us
Daily Top 2Weekly Top 5

'पुष्पा'नंतर वधारला अल्लू अर्जुनचा भाव; मानधनात केली 17 पटीने वाढ, एका दिवसासाठी चार्ज करतोय इतके रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 10:40 IST

अल्लू अर्जनुने 'पुष्पा'नंतर जाहिराती आणि ब्रँड अँडसॉरमेंटच्या मानधनात १७ पटीने वाढ केली आहे.

२०२१ साली प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा' या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं. अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत असलेल्या 'पुष्पा' चित्रपटातील गाणी आणि डायलॉगही खूप लोकप्रिय झाले होते. आजही दोन वर्षांनंतर 'पुष्पा' सिनेमाची क्रेझ कायम आहे. 'पुष्पा'मुळे अल्लू अर्जुनच्या चाहत्या वर्गातही मोठी वाढ झाली. त्याची पुष्पा स्टाइल खूपच लोकप्रिय झाली. 'पुष्पा'मुळे अल्लू अर्जुन  प्रसिद्धीझोतात आला. अल्लू अर्जुनने 'पुष्पा'नंतर त्याच्या मानधनातही वाढ केली आहे. 

अल्लू अर्जनुने 'पुष्पा'नंतर जाहिराती आणि ब्रँड अँडसॉरमेंटच्या मानधनात १७ पटीने वाढ केली आहे. 'इकोनॉमिक्स टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, 'पुष्पा' करण्याअगोदर अल्लू अर्जुन जाहिरातींसाठी ३५ कोटी मानधन घ्यायचा. आता एका दिवसासाठी तो ६ कोटी रुपये आकारतो. अल्ली अर्जुन व्यतिरिक्त इतरही दाक्षिणात्य कलाकारांनी गेल्या दोन वर्षांत मानधनात ८ पटीने वाढ केल्याची माहिती आहे. 

'पुष्पा'नंतर दिवसेंदिवस अल्लू अर्जुनच्या चाहत्यांमध्ये भर पडत आहे. या चित्रपटाने त्याला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवलं. 'पुष्पा'साठी अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. या सिनेमानंतर अल्लू अर्जुन अनेक ब्रँडचा चेहरा बनला. नुकतंच त्याने कोको-कोला, केएफसी, झोमॅटो आणि रेड बस यांचे प्रोजेक्ट हाती घेतले आहेत. 

दरम्यान, 'पुष्पा'नंतर आता लवकरच त्याचा सीक्वेलही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'पुष्पा २'साठी प्रेक्षक आतुर आहेत. या सिनेमातील त्याचा पहिला लूकही प्रदर्शित करण्यात आला आहे. १५ ऑगस्ट २०२४ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :अल्लू अर्जुनपुष्पासिनेमा