Join us

मुलगी पायलट असलेल्या विमानातून अलका कुबल यांचा प्रवास, शेअर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 11:36 IST

अलका कुबल यांनी इन्स्टाग्रामवर आपल्या मुलीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी आतापर्यंत विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. एक गुणी आणि सोज्वळ अभिनेत्री म्हणून त्या लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांचा फॅन फॉलोव्हिंग अद्याप कमी झालेला नाही. अलका कुबल या सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. या माध्यमातून त्या आपल्या आयुष्यातील अपडेट चाहत्यांना देत असतात. नुकतंच अलका यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टनं सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. 

अलका कुबल यांनी इन्स्टाग्रामवर आपल्या मुलीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो काही साधारण नाही. या फोटोत अलका कुबल यांच्या चेहऱ्यावर लेकीबद्दल असलेला अभिमान आणि आनंद झळकतोय. नुकतंच अलका यांनी त्यांची मुलगी पायलट असलेल्या विमानातून प्रवास केला. तो क्षण त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केलाय. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहलं, "आजच्या फ्लाइटसाठी माझी कॅप्टन". त्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी भरभरुन कमेंट केल्यात. 

अलका कुबल यांची मोठी मुलगी ईशानी ही पायलट आहे. ती सध्या वैमानिक म्हणून काम करतेय.  तिला अगदी सातवी आठवीपासूनच वैमानिक व्हायचं होतं.   तिच्याकडे वैमानिकाचं "लाइफटाइम लायसन्स" आहे. इशानी ही विवाहित असून निशांत वालिया असं तिच्या पतीचं नाव आहे. अलका कुबल यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्या लवकरच मंगला या सिनेमात झळकणार आहेत. हा सिनेमा पुढील वर्षात १७ जानेवारी २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.  

टॅग्स :अलका कुबलमराठी अभिनेतासेलिब्रिटी