Join us
Daily Top 2Weekly Top 5

म्हणून आलियाने 12 किलो वजनाचा लेहंगा परिधान करत कलंकचे शूटिंग केले पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 14:17 IST

आलियासह माधुरी दिक्षित आणि सोनाक्षीला असेच भरजरी कपड्यांसह भले मोठे दागिनेही त्यांना वापरावे लागत होते.

कलाकारांना उन्हातान्हातही भूमिकेच्या गरजेनुसार कपडे परिधान करावे लागतात. 'कलंक' सिनेमाचे शूटिंग हे गेल्यावर्षी मे आणि एप्रिल महिन्यातच सुरू होते. त्यावेळी आलियाने 12 किलो वजनाचा लेहंगा घातला होता. खूप ऊनही होते. अतिशय गरमीच्या महिन्यात तिने इतका भला मोठा वजनाचा लेहंगा घालून लग्नाच्या सिक्वेन्सचे शूटिंग पूर्ण केले होते. आलियासह माधुरी दिक्षित आणि सोनाक्षीला असेच भरजरी कपड्यांसह भले मोठे दागिनेही त्यांना वापरावे लागत होते. तिघांनाही शूटिंगवेळी या दागिन्यांचा आणि कपड्यांचा त्रास तर झाला शेवटी कथेची गरज म्हणून त्यांना शूटिंग करणे भागच होते.

विशेष म्हणजे आलियाने अशा प्रकारे पारंपरिक वेषात पहिल्यांदाच शूटिंग केले असे नाही. यापूर्वीही मेघना गुलजार दिग्दर्शित  ‘राजी’ सिनेमात आलियाला फक्त बिदाईच्या एका गाण्यासाठी तब्बल 175 वेळा साडी नेसावी लागली होती. लग्नानंतर तिला पाकिस्तानात जावं लागतं आणि हेच दृश्य चित्रीत करण्यासाठी दिग्दर्शकांना बरीच मेहनत घ्यावी लागली.

 

पूर्ण दृश्य चित्रीत होण्यापर्यंत आलियाला ती साडी १७५ वेळा नेसावी लागली. लग्नानंतर सीमा पार करून जात असतानाचा हा सीन चित्रीत करण्यासाठी बरेच रिटेक घ्यावे लागले होते. तसेच 'कलंक' सिनेमासाठी फक्त आलियाच नाहीतर साऱ्याच कलाकारांनी खूप मेहनत घेतली आहे.  'कलंक' हा मल्टीस्टारर सिनेमा आहे. सिनेमात आलिया  भट्ट, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त आणि माधुरी दीक्षितही झळकणार आहे. येत्या १७ एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.  

 

टॅग्स :आलिया भटकलंक