‘कलंक’च्या अपयशानंतर आलिया भट लवकरच ‘सडक 2’चे शूटींग सुरु करतेय. आलियाचे पापा महेश भट ‘सडक 2’ दिग्दर्शित करणार आहेत. २० वर्षांपूर्वी महेश भट्ट यांनी दिग्दर्शन सोडले होते. आता तब्बल दोन दशकानंतर ते पुन्हा एकदा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात वापसी करताहेत. खास बाब म्हणजे, या चित्रपटात ते पहिल्यांदा आपल्या मुलीला म्हणजे आलियाला डायरेक्ट करणार आहेत. साहजिकच, पापांसोबत काम करायला मिळणार म्हणून आलिया कमालीची उत्सुक आहेत. या उत्सुकतेमागे आणखी एक खास कारण आहे. ते म्हणजे, आलियाची या चित्रपटातील भूमिका.
REVEALED! ‘सडक 2’मध्ये आलिया भट साकारणार ही खास भूमिका!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 10:15 IST
‘सडक 2’मध्ये पापांसोबत काम करायला मिळणार म्हणून आलिया कमालीची उत्सुक आहेत. या उत्सुकतेमागे आणखी एक खास कारण आहे. ते म्हणजे, आलियाची या चित्रपटातील भूमिका.
REVEALED! ‘सडक 2’मध्ये आलिया भट साकारणार ही खास भूमिका!!
ठळक मुद्दे‘सडक 2’ या चित्रपटात आलियाशिवाय आदित्य राय कपूर, संजय दत्त, पूजा भट असे अनेक कलाकार दमदार भूमिकेत दिसणार आहे.