Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तू चांगली आई होऊ शकत नाही'; राहाच्या जन्मापूर्वी 'त्या' व्यक्तीने मारला होता आलियाला टोमणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 13:07 IST

Alia bhatt:राहाच्या जन्मानंतर अवघ्या ४ महिन्यात आलियाने तिचं वजन कमी करुन 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' या सिनेमासाठी एक गाणं शूट केलं.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia bhatt) सध्या तिच्या 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' या सिनेमामुळे चर्चेत येत आहे. राहाच्या जन्मानंतर आलियाचा रिलीज होणारा हा पहिला चित्रपट आहे. त्यामुळे आलिया या सिनेमासाठी प्रचंड उत्सुक आहे. विशेष म्हणजे राहाच्या जन्मानंतर अवघ्या ४ महिन्यात आलियाने तिचं वजन कमी करुन या सिनेमासाठी एक गाणं शूट केलं. त्यामुळे तिची नेटकऱ्यांमध्ये कमालीची चर्चा झाली. अलिकडेच आलियाने 'फेमिना'ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने लेकीच्या संगोपनाविषयी आणि लोकांनी तिला तिच्या मातृत्वावरुन केलेल्या ट्रोलिंगविषयी भाष्य केलं आहे.

'राहाचा जन्मापूर्वी आलियाला तू चांगली आई होऊ शकणार नाहीस', असं म्हणत ट्रोल केलं होतं. यावर तिने पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. "जीवनात तुम्ही कोणत्या गोष्टीला किती जास्त म्हत्त्व देता हे जास्त महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबादारी सांभाळत असताना मला स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ नसतो. एका व्यक्तीने मला सांगितलं होत. तू आयुष्यात कधीच चांगली आई, अभिनेत्री किंवा चांगली मुलगी काहीच होऊ शकत नाहीस. त्यानंतर मी फक्त माझे कुटुंबीय आणि मित्र-परिवार यांच्यासोबतच मनमोकळेपणा बोलते", असं आलिया म्हणाली.

पुढे ती म्हणते,' मी कायम जबाबदारीने वागायचा प्रयत्न करते. त्यामुळे केवळ कुटुंबासाठी मी माझं काम सोडणार नाही. किंवा, कामासाठी त्यांनाही सोडणार नाही. मी त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करेन.'

दरम्यान आलियाने नोव्हेंबर २०२२ मध्ये राहाला जन्म दिला. विशेष म्हणजे राहाच्या जन्मानंतर अवघ्या ४ महिन्यांमध्ये आलियाने तिचं वजन कमी केलं. त्यानंतर 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमातील 'तुम क्या मिले...' या गाण्याचं शूट केलं. आलियासोबत या सिनेमात रणवीर सिंह असून हा सिनेमा येत्या २८ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :आलिया भटबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमारणवीर सिंग