Join us

अली फजलचा प्रायव्हेट फोटो झाला लीक, नाराज झाला अली, पहा हा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 19:17 IST

'फुकरे' व 'फुकरे २' सिनेमातून प्रेक्षकांना भुरळ पाडणारा अभिनेता अली फजल नुकताच सायबर क्राईमचा शिकार झाला आहे.

'फुकरे' व 'फुकरे २' सिनेमातून प्रेक्षकांना भुरळ पाडणारा अभिनेता अली फजल नुकताच सायबर क्राईमचा शिकार झाला आहे. नुकताच त्याचा प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर लीक झाला आहे. अली फजलने याबाबतची नाराजी इंस्टाग्रामवर व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. आता हा फोटो हटविण्यात आला आहे. 

याबाबत अली फजल म्हणाला की, 'फोटो लीक झाल्यानंतर माझ्याजवळ कोणताच पर्याय उरला नाही. मी यावर काय बोलू? हे माझेच फोटो आहेत. हे फोटो माझे खासगी आहेत प्रसार माध्यमांना ते प्रदर्शित करण्याची गरज नाही. ही खूप वाईट गोष्ट आहे. या बद्दल मला काही जास्त बोलायचे नाही. मी या गोष्टीच्या तळात जाणार नाही. याला कोण जबाबदार आहे याचा शोध मी घेईन. मात्र तोपर्यत माझे फॅन्स आणि मित्रांनी माझ्यावर विश्वास ठेवा व माझ्यासोबत उभे राहा.'

अली फजल असा पहिला सेलिब्रेटी नाही ज्याचे फोटो लीक झालेत. अभिनेत्री श्रुती हसनची छोटी बहिण अक्षरा हसन, हंसिका मोटवानी, सारा खान, मोना सिंग यांसारख्या काही कलाकारांना याचा सामना करावा लागला होता. प्रोफेशनल लाईफबद्दल सांगायचे तर अली फजलची 'मिर्झापूर' ही वेबसीरिज काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाली. यात त्याने गुड्डू भय्याची भूमिका साकारली असून त्याचे काम रसिकांना खूपच भावले. आता या वेबसीरिजचा सीक्वल येत आहे. 

टॅग्स :मिर्झापूर वेबसीरिजअली फजल