Join us

Video: करारी नजर अन् जबरदस्त अभिनय! 'छावा'च्या सेटवर अक्षय खन्नाच्या 'औरंग'ची दहशत, व्हिडीओ बघाच

By देवेंद्र जाधव | Updated: March 11, 2025 12:33 IST

अक्षय खन्नाने औरंगजेबाच्या शूटिंगसाठी किती मेहनत घेतली हे छावाच्या सेटवरील व्हिडीओ पाहून तुमच्या लक्षात येईल. बातमीवर क्लिक करुन लगेच बघा (chhaava)

'छावा' सिनेमाची (chhaava movie) सध्या सर्वांना उत्सुकता आहे. या सिनेमातील सर्वच कलाकारांच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं. विकी कौशलने (vicky kaushal) सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना झळकली होती. तर औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना पाहायला मिळाला. 'छावा'च्या सेटवरुन एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय. यात औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्नाने (akshaye khanna) घेतलेली मेहनत दिसून येतेय.ऑन स्क्रीन अन् ऑफ स्क्रीनही औरंगजेब'छावा'च्या सेटवरील BTS व्हिडीओ रिलीज करण्यात आलाय. या व्हिडीओत औरंगजेबाच्या भूमिकेसाठी अक्षय खन्नाने केलेली तयारी दिसून येते. याशिवाय अक्षय खन्नाचे सीन कसे शूट करण्यात आले, याचीही झलक बघायला मिळते. अक्षय खन्ना सीननंतर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांसोबत चर्चा करताना दिसतो. याशिवाय अक्षय खन्ना, विकी कौशल, विनीत कुमार सिंग यांच्याही शूटिंगची झलक दिसते. एकूणच अक्षय खन्नाचं भूमिकेसाठी डेडीकेशन पाहायला मिळतं. पुढे याच व्हिडीओत छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरातून झालेली कैद पाहायला मिळते. हा थरारक सीन शूटिंग करताना विकीने त्याची भावना सर्वांसमोर व्यक्त केली आहे. हजारो ज्युनियर आर्टिस्ट या सीनसाठी एकत्र आले होते. त्यांच्यासोबत विकीला शूट करायचं होतं. या सीनसाठी खूप रिहर्सल करण्यात आल्या. त्यानंतर विकी कॅमेरासमोर गेल्यावर लक्ष्मण उतेकरांनी हे सीन शूट केले. कल्पनेतले शंभूराजे पडद्यावर साकार झाले, या भावनेने दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांना गहिवरुन आल्याचं दिसतं.

टॅग्स :अक्षय खन्नाबॉलिवूड'छावा' चित्रपटविकी कौशल