Join us
Daily Top 2Weekly Top 5

या सख्ख्या भावांना ओळखलंत का? ते दोघे आहेत ७०च्या दशकातील अभिनेत्यांची मुलं अन् स्वतःही आहेत अभिनेते

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 08:00 IST

सोशल मीडियावर दोन भावांचा एक फोटो व्हायरल होत असून, दोघेही दिग्गज अभिनेते आहेत.

स्टार्सचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात.  सोशल मीडियावर दोन भावांचा एक फोटो व्हायरल होत असून, दोघेही दिग्गज अभिनेते आहेत. यातील एक प्रसिद्ध अभिनेता आहे तर दुसरा खलनायक.  सोशल मीडियावर चाहत्यांचे प्रचंड प्रेम मिळत आहे. तुम्ही त्यांना ओळखू शकलात का, जर नाही, तर आम्ही तुम्हाला हिंद देतो.  या दोन्ही भावांचे वडील 70 च्या दशकातील सुपरस्टार होते.

व्हायरल होणार हा फोटो अभिनेता अक्षय खन्ना आणि त्याचा भाऊ राहुल खन्ना आहे. अक्षय आणि राहुल हे दोघेही ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे पुत्र आहेत, ज्यांचे 2017 मध्ये निधन झाले.राहुल खन्ना आज त्याचा वाढदिवस साजरा करतो आहे. राहुल खन्नाने दिग्दर्शक दीपा मेहताच्या ‘1947 अर्थ’ या सिनेमातून डेब्यू केला होता. या सिनेमासाठी राहुलला फिल्मफेअर बेस्ट डेब्यू अवार्डही मिळाला होता.  

सैफ अली खानचा ‘लव आज कल’ या सुपरहिट सिनेमातही तो दिसला.  2007 साली ‘रकीब’ या सिनेमात तो झळकला. अनुराग सिंहने दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात राहुल खन्नासोबत जिमी शेरगील, तनुश्री दत्ता मुख्य भूमिकेत होते.

रकीब या सिनेमानंतर राहुल खन्नाचा लुक प्रचंड बदलला. आपल्या फिल्मी करिअरमध्ये राहुलने सुमारे 11 चित्रपटांत काम केले. पण  सिनेमे चालेनात. मग राहुल खन्ना छोट्या पडद्याकडे वळला. ‘द अमेरिकन्स’ या टीव्ही शोमध्ये तो दिसला. राहुल सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टावर तो रोज नवे फोटो शेअर करत असतो. विनोद खन्ना सारख्या सुपरस्टारचा मुलगा असूनही राहुलला लाईमलाईटपासून दूर राहणे आवडते.

सुरूवातीपासूनच राहुल स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करू इच्छित होता. कदाचित त्याचमुळे त्याला बॉलिवूड भावले नाही. आज राहुल खन्ना भलेही बॉलिवूडमधून गायब आहे. लाईमलाईटपासून दूर आहे. पण म्हणून त्याची लोकप्रियता कमी नाही. संपूर्ण आशियात त्याचे असंख्य फॅन्स आहेत आणि यात तरूणींची संख्या मोठी आहे. 

टॅग्स :विनोद खन्ना