Join us

अक्षय-सोनाक्षीच्या ‘या’ चित्रपटाचा तब्बल ७ वर्षांनंतर सिक्वेल येणार!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 16:15 IST

२०१२ मध्ये आलेल्या अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा स्टारर 'रावडी राठोड' चित्रपटाचाही सिक्वेल येणार असल्याची चर्चा आहे. प्रभुदेवा दिग्दर्शित 'रावडी राठोड'ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता 'रावडी राठोड'च्या सात वर्षांनंतर या अ‍ॅक्शन-कॉमेडी चित्रपटाचा सिक्वेल येण्याची बी-टाऊनमध्ये चर्चा आहे.

अ‍ॅक्शन-रोमान्सचे योग्य समीकरण म्हणजे अक्षय कुमारचे चित्रपट. तसेच बॉलिवूडमध्ये सध्या सिक्वेल चित्रपटांचा ट्रेंड चालू आहे. 'जुडवा २', 'स्टूडेंन्ट ऑफ द ईयर २' या चित्रपटांनी अलीकडेच बॉक्स ऑफिसवर  चांगला गल्ला जमवला. प्रदर्शित झाले. आता 'कूली नं.१' आणि 'किक'चा सिक्वेल येण्याच्या मार्गावर आहे. २०१२ मध्ये आलेल्या अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा स्टारर 'रावडी राठोड' चित्रपटाचाही सिक्वेल येणार असल्याची चर्चा आहे. प्रभुदेवा दिग्दर्शित 'रावडी राठोड'ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता 'रावडी राठोड'च्या सात वर्षांनंतर या अ‍ॅक्शन-कॉमेडी चित्रपटाचा सिक्वेल येण्याची बी-टाऊनमध्ये चर्चा आहे.

 सुत्रांनुसार, ‘रावडी राठोड २’चे लिखाण सुरु असल्याची माहिती आहे. या सिक्वेलमध्येही अक्षय कुमार प्रमुख भूमिका साकारण्याची शक्यता आहे. पहिल्या 'रावडी राठोड'मध्ये अक्षय कुमारसोबत सोनाक्षी सिन्हाने स्क्रिन शेअर केली होती. आता या सिक्वेलमध्ये अक्षयसोबत कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागेल हे पाहणं मजेशीर ठरणार आहे.

पुढील वर्षी रावडी राठोड २ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली जाऊ शकते. 'रावडी राठोड'मध्ये अक्षयने डबल रोल साकारला होता. 'रावडी राठोड' एस.एस.राजामौली यांचा साउथ चित्रपट 'विक्रमरकुडू'चा रिमेक होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. चित्रपटातील गाणीही ब्लॉकबस्टर ठरली होती. आता 'रावडी राठोड'चा सिक्वेल काय बॉक्स ऑफिसवर  काय कमाल करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टॅग्स :सोनाक्षी सिन्हाअक्षय कुमार