Join us

अक्षय कुमारचा 'खेल खेल में' या हॉलिवूड सिनेमावर आधारीत! याआधी २७ वेळा झालाय रिमेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 15:46 IST

अक्षय कुमारच्या आगामी 'खेल खेल में' सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा असून हा सिनेमा एका गाजलेल्या सिनेमाचा रिमेक आहे याचा खुलासा झालाय (khel khel mein, akshay kumar)

अक्षय कुमारच्या आगामी 'खेल खेल में' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. मल्टिस्टारर असलेला हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत यात शंका नाही. अक्षयचे यावर्षी रिलीज झालेले सर्व सिनेमे बॉक्स ऑफिसवर तितके कमाल दाखवू शकले नाहीत. त्यामुळे सर्वांना 'खेल खेल में' सिनेमाची उत्सुकता आहे. अशातच हा सिनेमा एका गाजलेल्या हॉलिवूड सिनेमाचा रिमेक असल्याची माहिती समोर येतेय. या मूळ सिनेमाचा तब्बल २७ भाषांमध्ये रिमेक बनवला गेलाय. हा सिनेमा कोणता आहे, जाणून घ्या.

'खेल खेल में' सिनेमा या सिनेमावर आधारीत

अक्षय कुमारचा आगामी 'खेल खेल में' सिनेमा प्रसिद्ध इटालियन सिनेमा Perfetti Sconosciuti चा रिमेक आहे. या इटालियन सिनेमावर 'परफेक्ट स्ट्रेंजर्स' (Perfect Strangers) हा हॉलिवूड सिनेमा बनला होता. या मूळ सिनेमाच्या नावावर गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला गेलाय. कारण जगभरातील २४ भाषांमध्ये या सिनेमाचा रिमेक उपलब्ध आहे. २०१६ मध्ये आलेल्या या इटालियन सिनेमाचे ८ वर्षात इतके रिमेक बनवले गेले आहेत. विशेष म्हणजे भारतात २०२२ साली आलेल्या 12th Men  या मल्याळम सिनेमाची कल्पना या सिनेमावर आधारीत होती. मूळ सिनेमाचा हॉलिवूड रिमेक Perfect Strangers हा सिनेमा ओटीटीवर उपलब्ध आहे.

 

खेल खेल में सिनेमाविषयी

'खेल खेल में' सिनेमात अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत आहे. त्याच्यासोबत वाणी कपूर, तापसी पन्नू, फरदीन खान, अॅमी वर्क, आदित्य सील आणि प्रज्ञा जैस्वाल या कलाकारांच्या प्रमूख भूमिका आहेत. 'खेल खेल में' सिनेमा या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट २०२४ ला रिलीज होणार आहे. या सिनेमासोबत 'स्त्री २' हा सिनेमाही रिलीज होणार आहे. त्यामुळे 'खेल खेल में' आणि 'स्त्री २' यापैकी कोणता सिनेमा चालणार आणि कोणता फ्लॉप होणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

टॅग्स :अक्षय कुमारफरदीन खानवाणी कपूरबॉलिवूड