Join us
Daily Top 2Weekly Top 5

"त्याच्या बहादुरीला सलाम.."; सैफवर झालेल्या हल्ल्यावर अक्षय कुमार पहिल्यांदाच झाला व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 09:01 IST

अक्षय कुमारने सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावर त्याचं मत व्यक्त केलंय. काय म्हणाला अक्षय? (saif ali khan, akshay kumar)

सैफ अली खानवर चोराने हल्ला केला आणि त्यात अभिनेता गंभीर जखमी झाला. अडीच इंचाच्या चाकूचा तुकडा सैफच्या मणक्यात शिरला. सुदैवाने सैफला कोणतीही मोठी दुखापत झाली नाही. डॉक्टरांच्या मदतीने सैफवर यशस्वी सर्जरी झाली. आता अभिनेत्याची प्रकृती स्थिर आहे. सैफ धाडस दाखवून घरात शिरलेल्या चोराला सामोरा गेला होता. त्यामुळे सैफचं कुटुंब सुरक्षित राहिलंं. सैफचा खास मित्र आणि अभिनेता अक्षय कुमारने यानिमित्ताने त्याचं कौतुक केलं.

सैफवर झालेल्या हल्ल्यावर अक्षय काय म्हणाला?

अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी 'स्काय फोर्स' सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या एका प्रमोशनल इव्हेंटदरम्यान अक्षयने सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय म्हणाला की, "ही खूप चांगली गोष्ट आहे की तो सुरक्षित आहे. आम्ही सर्व आनंदी आहोत. संपूर्ण इंडस्ट्रीला सैफ सुखरुप आहे याचा आनंंद आहे. सैफने बहादुरी दाखवून त्याच्या कुटुंबाची रक्षा केली म्हणून मी त्याला सलाम करतो. आम्ही मैं खिलाडी तू अनाडी हा सिनेमा बनवला होता. परंतु पुढच्या वेळेस आम्ही दोन खिलाडी मिळून एक सिनेमा करु."

सैफची हेल्थ अपडेट

लीलावती रुग्णालयातील डॉक्टर नितीन डांगे यांनी सैफच्या प्रकृतीविषयी अपडेट देताना सांगितलं की, "सैफला रुग्णालयातून घरी पाठवण्याचा निर्णय पुढील १-२ दिवसात घेतला जाईल. सध्या तो हळूहळू बरा होत आहे. वॉकही करत आहे. त्याच्या मणक्यात जखम आहे त्यामुळे इंजेक्शन व्हायच्या शक्यता जास्त आहेत. म्हणूनच त्यांना भेटायला येणाऱ्यांनाही आता थांबवण्यात आलं आहे. तो  पुढील २ दिवसात त्याला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. मात्र काही महिने त्याला आराम करायची गरज आहे."

टॅग्स :सैफ अली खान बॉलिवूड