Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video : अक्षय कुमारच्या 'गोल्ड'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2018 10:30 IST

अक्षय कुमारच्या आगामी 'गोल्ड' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय.

मुंबई : अक्षय कुमारच्या आगामी 'गोल्ड' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. 1948 ऑलिम्पिकमध्ये भारताने पहिलं हॉकी गोल्ड मेडल जिंकलं होतं त्याची कथा या सिनेमात बघायला मिळणार आहे. 

अक्षय कुमार या सिनेमात हॉकी कोचच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पहिल्यांदाच भारतीय हॉकीच्या सुवर्णकाळाबाबत माहिती मिळणार आहे. या सिनेमाच अक्षय कुमारच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री मौनी रॉय साकारणार आहे. 

रीमा कागती यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून एस्सेल एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. येत्या 15  ऑगस्टला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

टॅग्स :अक्षय कुमारबॉलिवूड