अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अर्शद वारसी (Arshad Warsi) यांचा बहुप्रतिक्षित कोर्टरुम ड्रामा 'जॉली एलएलबी ३' (Jolly LLB 3) ची रिलीज डेट जाहीर झाली आहे. जॉली एलएलबीच्या पहिल्या दोन्ही पार्टमधून अक्षय आणि अर्शद वारसी या जोडीने वकिलाच्या भूमिकेतून प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. आता पुन्हा दोघंही कोर्टरुममध्ये एकमेकांसमोर येणार आहेत. सिनेमा कधी प्रदर्शित होणार याची तारीख समोर आली आहे.
'जॉली एलएलबी'चा तिसरा पार्ट येणार अशी घोषणा झाली तेव्हापासूनच सिनेमाची उत्सुकता निर्माण झाली होती. पहिले दोन्ही पार्ट बॉक्सऑफिसवर तुफान गाजले. त्यामुळे तिसऱ्या पार्टसाठी वाट पाहावी लागणार होती. मात्र आता प्रतिक्षा संपली आहे. मेकर्सने रिलीज डेटची घोषणा केली आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांच्यानुसार, सिनेमाची रिलीज डेट लॉक करण्यात आली आहे. यावर्षी १९ सप्टेंबर रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सुभाष कपूर यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या सिनेमात अक्षय कुमार जॉली मिश्रा आणि अर्शद वारसी जॉली त्यागीच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचं शूट सुरु झालं तेव्हाचा व्हिडिओ दोघांनी सोशल मीडियावर शेअर केला होता.
'जॉली एलएलबी ३' ८ वर्षांनी सिनेमागृहात रिलीज होत आहे. दुसरा पार्ट २०१७ मध्ये आला होता. त्यात अक्षय कुमार, अन्नू कपूर आणि हिमा कुरेशीही होते. तर सौरभ शुक्ला, सयानी गुप्ता, मानव कौल यांची भूमिका होती. पहिल्या पार्टमध्ये अर्शद वारसी, बोमन इरानी, अमृता राव, संजय मिश्रा, बिजेंद्र काला यांची भूमिका होती. अक्षय आणि अर्शदच्या कॉमिक टायमिंगने पुन्हा प्रेक्षक खळखळून हसणार आहेत हे नक्की. त्यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.