Join us
Daily Top 2Weekly Top 5

एंटिलियात आकाश- श्लोकाचा साखरपुडा, मम्मी गौरीसोबत दिसला ‘स्टाईलिश’ आर्यन खान!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2018 09:21 IST

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी व त्याची बालमैत्रिण श्लोका मेहता या दोघांचा साखरपुडा काल ३० जूनला पार पडला.

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी व त्याची बालमैत्रिण श्लोका मेहता या दोघांचा साखरपुडा काल ३० जूनला पार पडला.गेल्या काही दिवसांपासून या साखरपुड्याची धामधूम सुरू होती. साखरपुड्याआधी आधी मेहंदी, मग प्री एंजेगमेंट पार्टी पार पडली. यानंतर काल अंबानींच्या एंटिलियामध्ये अगदी थाटामाटात, धूमधडाक्यात साखरपुडा झाला. साहजिकचं यावेळी अंबानींच्या कुटुंबाच्या जवळचा मित्रपरिवार, नातेवाईकांसह बॉलिवूड सेलिब्रिटींची उपस्थिती होती. 

साखरपुडा पार पडल्याानंतर नीता अंबानी, आकाश अंबानी, श्लोका मेहता, ईशा अंबानी व अनंत अंबानी यांनी बाहेर येत मीडियाला पोझ दिली.

कालच्या साखरपुडयाला शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान मॉम गौरी खानसोबत दिसला. त्याला पाहून सगळ्यांनाच शाहरूख आठवला नसेल तर नवल.

अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन मुलगी नव्या नंदासोबत या सोहळ्याला पोहोचली. यावेळभ नव्या साडीत होती.

अर्जुन कपूर रूबाबदार पोशाखात यावेळी दिसला.

अभिनेता रणबीर कपूर या पार्टीत दिसला. आई नीतूसोबत तो आला होता. यापूर्वीच्या प्री-एंगेजमेंट पार्टीलाही तो हजर होता.

अभिनेता टायगर श्रॉफ त्याची कथित गर्लफ्रेन्ड दिशा पटनीसोबत या इव्हेंटमध्ये दिसला.

अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय मुलगी आराध्यासोबत या पार्टीत हजर होते.

माधुरी दीक्षित पती श्रीराम नेनेसोबत या पार्टीला उपस्थित होती.

टॅग्स :आकाश अंबानी