Join us
Daily Top 2Weekly Top 5

चर्चा तर होणारच ! मिका सिंगने केले प्रसिध्द अभिनेत्रीसह लग्न ? गुरुद्वारामधला फोटो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 14:09 IST

Akanksha Puri Mika Singh Wedding Photo: मिका सिंग आणि आकांक्षा पुरीचा फोटोवरुन लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत.इतकेच नाही तर फिलींग ब्लेस्ड अशी कॅप्शनही दिली आहे.

कोरोना काळातही अनेक सेलिब्रेटींना सगळे नियम पाळत लग्न करत आयुष्याला सुरुवात केली. गायक मिका सिंगचाही असाच एक फोटो समोर आला आहे. हा फोटो पाहून अनेकजण संभ्रमात पडले आहेत. गुरुद्वारामध्ये मिकाने अभिनेत्री आकांक्षा पुरीसह लग्न केल्याचे वाटते. इतकेच नाही तर फिलींग ब्लेस्ड अशी कॅप्शनही दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये अफेरच्या चर्चा रंगत होत्या. आजपर्यंत दोघांनीही कधीच ते प्रेमात असल्याचे सांगितले नव्हते. सतत एकत्र फिरणे, एकत्र दिसल्यामुळे या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या. 

आता गुरुद्वारामध्ये दोघांचा एकत्र फोटो पाहून त्यांच्या लग्नाच्याही चर्चा जोर धरत आहेत. फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून अनेकांनी अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त दुसरीकडे आकांक्षाला लग्नाविषयी विचारले. अखेर आकांक्षानेच या फोटोचे सत्य सांगितले आहे. फोटोवरुन लग्न झाल्याचे निकष लावणा-यांना आकांक्षाने खरे काय आहे हे सांगितले आहे.

 

मात्र दोघांचे लग्न झाले नसल्याचे तिने म्हटले आहे. सध्या सुरु असणा-या चर्चा या केवळ अफवा असल्याचे तिने म्हटले आहे. आकांक्षा २०१९ मध्ये बिग बॉसचा स्पर्ध पारस छाबडासह असलेल्या अफेअरमुळे चर्चेत होती. मात्र या दोघांचे नाते फार काळ काही टिकले नाही. काही कारणामुळे दोघांचे ब्रेकअप झाल्याचेही समोर आले होते.

उर्वशी रौतेलाला या प्रसिद्ध गायकाने लग्नासाठी केले होते प्रपोज, या कारणामुळे दिला नकार

सध्या  मिका अविवाहीत आहे पण काही दिवसांपूर्वी अशी बातमी होती की मिका एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आहे. आणि तिच्याबरोबर त्याला लग्न करायचे आहे. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे उर्वशी रौतेला.उर्वशी रौतेला बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींमध्ये गणली जाते आणि तिच्या सौंदर्याची भूरळ मिकालाही पडली.

मिका सिंगने लग्न करण्यासाठी ठेवलीय ही अट, थेट सलमान खानसोबत आहे या अटीचा संबंध

‘इंडियन प्रो-म्युझिक लीग’मध्ये ‘पंजाब लायन्स’चा कप्तान मिका सिंगने सांगितले, “मला लग्न करायचं असून त्यासाठी मी योग्य मुलीचा शोध घेत आहे. कदाचित ‘इंडियन प्रो-म्युझिक लीग’ कार्यक्रमादरम्यानच मला सुयोग्य नवरी सापडेलही, पण सलमान खानने लग्न केल्यानंतरच मी लग्न करणार आहे. ही माझी अट आहे. तोपर्यंत मी सिंगल जीवन मजेत जगणार आहे. साजिद भाईने आधी म्हटल्याप्रमाणे सलमान भाईनंतर बॉलीवूडच्या जगात केवळ मीच अविवाहित तरूण असेन. मला हे बिरूद जास्तीत जास्त काळ मिरवायचं आहे.”

टॅग्स :मिका सिंग