महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. आज (२८ जानेवारी) सकाळी मुंबईहून अजित पवार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारासाठी बारामतीला गेले होते. विमान लँड होण्याआधीच कोसळलं. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. ही बातमी समजताच सयाजी शिंदे तातडीने रुग्णालयात पोहचले.
बारामतीतील रुग्णालयाबाहेर काळजाचा ठोका चुकवणारे दृश्य पाहायला मिळाले. गर्दी प्रचंड असल्यामुळे पोलिसांनी त्यांना कडेकोट बंदोबस्तात रुग्णालयात नेले. सयाजी शिंदे यांना अजित पवार यांच्या जाण्यानं प्रचंड धक्का बसलाय. त्यांचे डोळे पाणावले होते, ते पूर्णपणे कोलमडून गेल्याचं दिसलं, त्यांना बोलताही येत नव्हतं.
सयाजी शिंदे यांनी ११ ऑक्टोबर २०२४ रोजी दादांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला होता. "दादांच्या कामाच्या पद्धतीवर माझा विश्वास आहे", असे ते नेहमी अभिमानाने सांगायचे. विशेष म्हणजे एकदा सयाजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात "गडी अंगानं उभा आणि आडवा, त्याच्या रुपात गावरान गोडवा..." हे अस्सल गावरान गाणं अजित पवार यांनी गायलं होतं.
Web Summary : Ajit Pawar's sudden death in a plane crash shocked Maharashtra. Actor Sayaji Shinde, a close associate, was devastated by the news. He rushed to the hospital, visibly heartbroken and speechless at the loss.
Web Summary : अजित पवार की विमान दुर्घटना में आकस्मिक मृत्यु से महाराष्ट्र स्तब्ध है। करीबी सहयोगी अभिनेता सयाजी शिंदे खबर से तबाह हो गए। वे अस्पताल पहुंचे, स्पष्ट रूप से दुखी और नुकसान पर अवाक थे।