अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे बॉलिवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहेत. नुकतंच ऐश्वर्या आणि अभिषेकने लग्नाचा १८वा वाढदिवस साजरा केला. ऐश्वर्याने अॅनिव्हर्सरीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. अभिषेक-ऐश्वर्याची लेकही त्यांच्याप्रमाणेच लोकप्रिय स्टारकिड आहे. आपल्या लाडक्या लेकीसाठी अभिषेक आणि ऐश्वर्याने नुकतीच दुबईत प्रॉपर्टी खरेदी केली आहे.
दुबईतील जुमेरा गोल्फ इस्टेटमधील सेंच्युअरी फॉल्समध्ये अभिषेक-ऐश्वर्याने एक लॅविश व्हिला खरेदी केला आहे. खरं तर हे त्यांचं हॉलिडे होम आहे. कधी कधी ऐश्वर्या-अभिषेक लेकीसह दुबईतील या व्हिलामध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी जातात. दुबईतील त्यांच्या या लक्झरियस व्हिलामध्ये स्विमिंगपूल आणि गोल्फ कोर्सदेखील आहे. आराध्याच्या जन्मानंतर २०१५ सालीच ऐश्वर्या-अभिषेकने हा व्हिला खरेदी केला होता. याची किंमत सुमारे १६ कोटींइतकी आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ऐश्वर्या-अभिषेकच्या दुबईतील या घराच्या आसपास शाहरुख खान, शिल्पा शेट्टी यांचे देखील हॉलिडे होम्स आहेत.
ऐश्वर्या-अभिषेकने २००७ साली लग्न करत संसार थाटला. लग्नानंतर ४ वर्षांनी ऐश्वर्याने आराध्या या त्यांच्या लेकीला जन्म दिला. मिस वर्ल्ड असलेली ऐश्वर्या ही ७७६ कोटींची मालकीण आहे. तर अभिषेकच्या नावावर २८० कोटींची प्रॉपर्टी आहे.