Join us

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय दिसले एकत्र, आशुतोष गोवारीकरांच्या मुलाच्या लग्नात हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 17:40 IST

ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांना एकत्र पाहून चाहते खूप आनंदी झाले. 

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर (Ashutosh Govarikar) यांचा लेक कोणार्क गोवारीकरचं (Konark Govarikar) थाटामाटात लग्न पार पडलं.  या लग्नसोहळ्यात बॉलिवुडचे दिग्गज चेहरे उपस्थित राहिले होते. फिल्म जगतात प्रसिद्ध असलेली अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) ही जोडीदेखील आशुतोष गोवारीकर यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात सहभागी झाली होती.  ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांना एकत्र पाहून चाहते खूप आनंदी झाले. 

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनचे लग्नातील  फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघांनीही एकाच रंगाचे कपडे घातले होते आणि ते खूपच सुंदर दिसत होते. आशुतोष गोवारीकरच्या मुलाच्या लग्नाला एकत्र पोहोचताच, सर्वजण त्यांच्याकडे पाहतच राहिले. या लग्नात ऐश्वर्या आणि अभिषेक हे इस्कॉन मंदिराचे हरिनाम दास यांना भेटले.  हरिनाम दास यांनी त्यांच्या भेटीचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. दोघांच्या या फोटोनं त्यांच्या घटस्फोटाच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी हार्ट इमोजी कमेंट करत आनंद व्यक्त केलाय.

अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या अफवा अनेक दिवसांपासून सुरू होत्या. याता समोर आलेले हे फोटो अफवांचं पेव उठवणाऱ्यांना चपकार किंवा सडेतोड उत्तर म्हणता येईल. मीडिया रिपोर्टनुसार, मोठ्या पडद्यावर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे हे नवरा-बायको दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या चित्रपटात दिसणार आहेत. अभिषेक आणि ऐश्वर्याचे लग्न २००७ मध्ये झाले होते. २०११ मध्ये त्यांची मुलगी आराध्याचा जन्म झाला.  

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनअभिषेक बच्चनआशुतोष गोवारिकर