Join us
Daily Top 2Weekly Top 5

"खलनायिकेचा अवॉर्ड तुम्हाला मिळायला हवा होता", चाहत्याच्या प्रश्नावर ऐश्वर्या नारकर यांनी दिलं उत्तर, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 15:31 IST

ऐश्वर्या यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर askme सेशन घेतलं होतं. या सेशनमध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना ऐश्वर्या यांनी उत्तरं दिली.

ऐश्वर्या नारकर या मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. अभिनयाने त्यांनी एक काळ गाजवला आहे. ऐश्वर्या या सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. त्यांचा चाहता वर्ग मोठा असून वैयक्तिक जीवन आणि करिअरमधील अपडेट्स त्या चाहत्यांना देत असतात. नुकतंच ऐश्वर्या यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर askme सेशन घेतलं होतं. या सेशनमध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना ऐश्वर्या यांनी उत्तरं दिली. 

ऐश्वर्या यांनी घेतलेल्या या सेशनमध्ये एका चाहत्याने नुकत्याच पार पडलेल्या झी मराठी अवॉर्ड सोहळ्याबाबत प्रश्न विचारला. यंदाचा सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेतील भुवनेश्वरीची भूमिका साकारणाऱ्या कविता लाड यांना मिळाला. या पुरस्कारासाठी ऐश्वर्या यांनादेखील नामांकन मिळालं होतं. पण, त्यांना सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा अवॉर्ड मिळाला नाही. त्यामुळे चाहते नाराज झाले आहेत. 

एका चाहत्याने "खलनायिकेचा अवॉर्ड शार्गिवला मिळायला पाहिजे होता", असं म्हटलं आहे. याला उत्तर देत ऐश्वर्या नारकर यांनी "Hmmm" असं म्हणत हसण्याचा इमोजी पोस्ट केला आहे. तर दुसऱ्या चाहत्यानेही ऐश्वर्या यांना यावरुनच प्रश्न विचारला. या प्रश्नाला ऐश्वर्या यांनी दिलेल्या उत्तराने मात्र नेटकऱ्यांची मनं जिंकून घेतली आहेत. 

"खलनायिकेचा अवॉर्ड तुम्हाला मिळायला हवा होता. म्हणजे शार्गिवला...तुम्ही खूप छान काम करता", असं चाहत्याने म्हटलं. त्यावर रिप्लाय करत ऐश्वर्या म्हणाल्या, "तुम्ही हे म्हणालात हेच अवॉर्ड आहे".  ऐश्वर्या नारकर या झी मराठीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत आहेत.

टॅग्स :ऐश्वर्या नारकरझी मराठीटिव्ही कलाकार