Join us
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्यमान खुराणा समलैंगिकाची भूमिका साकारल्यानंतर आता करणार 'ही' भूमिका !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 12:28 IST

'दम लगाके हायशा' ,'बाला', 'ड्रिम गर्ल', 'अंधाधून', 'बधाई हो' असे अनेक हिट सिनेमा त्याने आपल्या नावावर केले आहेत.

कलाकार हे नवीन काहीतरी करण्याच्या शोधात असतात. मात्र आयुष्यमानने एकाच पठडीतले सिनेमा करण्याचा जणू सपाटाच लावाला आहे. नुकताच आयुष्यमान खुराणाचा 'शुभ मंगल ज्यादा सावधान' सिनेमा प्रदर्शित झाला. सिनेमात त्याने 'गे' ची भूमिका साकारली आहे. सिनेमातील त्याच्या भूमिकेला रसिकांनी पसंती दर्शवली. 'विकी डोनर' सिनेमामुळे आयुष्यमान ख-या अर्थाने प्रकाशझोतात आला. सिनेमात त्याने साकारलेल्या स्पर्म डोनरच्या भूमिकेमुळे त्याच्याकडे नंतर सगळे तशाच सिनेमांच्या ऑफर्स येऊ लागल्या.  

'दम लगाके हायशा' ,'बाला', 'ड्रिम गर्ल', 'अंधाधून', 'बधाई हो' असे अनेक हिट सिनेमा त्याने आपल्या नावावर केले आहेत. या सिनेमातील प्रत्येक भूमिकेला रसिकांनीही प्रचंड पसंती दर्शवली आहे.  आता पुन्हा एकदा आयुष्यमान नव्या भूमिकेत झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. आता तो  'स्त्री रोगतज्ञा'ची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमात त्याच्या बरोबर अलाया फर्नीचरवालाही झळकणार आहे. एकीकडे चाकोरीबाहेरील कथांवर बनलेल्या सिनेमांना आयुष्यमान पतंसी देतो या गोष्टीमुळे त्याचे कौतुक होत असते तर दुसरीकडे तोच तो पणा त्याच्या भूमिकांमध्ये येत असल्याचेही त्याच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कुठेतरी आयुष्यमानने यापलिकडेही जाऊन विषय निवडण्यास प्राधान्य द्यावे असेही कमेंटसद्वारे चाहते त्याला सुचवत आहेत. 

उत्तम अभिनेता असण्यासोबत त्याला गायनाचीही आवड आहे. आयुष्मानने त्याच्या गायनाचे सीक्रेट सांगितले,‘मी काही शोजसाठी ट्रेनमधून जायचो. तेव्हा मी गाणे म्हणून लोकांकडून पैसा मिळवायचो. प्रत्येक कलाकाराला संधी मिळते, त्याने फक्त त्याचे सोने केले पाहिजे, एवढेच. मेहनत करायला हवी असे तो नेहमी सांगतो. 

टॅग्स :आयुषमान खुराणाअलाया फर्निचरवाला