Join us
Daily Top 2Weekly Top 5

वीणानंतर शिव ठाकरेच्या आयुष्यात झाली 'ड्रीम गर्ल'ची एन्ट्री, मिका सिंगच्या दुल्हनियाला करतोय डेट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 18:39 IST

Shiv Thakare : शिव ठाकरे त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिव ठाकरे पुन्हा प्रेमात पडला आहे.

बिग बॉसचा सोळावा सीझन जरी संपला असला तरी त्यातले सर्वच स्पर्धक चर्चेत असतात. सोशल मीडियावर त्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. या शोनंतर अनेक स्पर्धकांचे नशीब फळफळले आहे. स्पर्धकांना एकामागून एक अनेक प्रोजेक्ट मिळत आहेत. दरम्यान, या शोचा स्पर्धक शिव ठाकरे हा देखील सतत चर्चेत आहे. तो लवकरच रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी १६' या शोमध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर शिव ठाकरे त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिव ठाकरे (Shiv Thakare) पुन्हा प्रेमात पडला आहे. त्याच्या आयुष्यात नवीन ड्रीम गर्लची एन्ट्री झाली आहे. शिव एका प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीला डेट करत असल्याचे सांगितले जात आहे.

शिव ठाकरे त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत राहिलेला आहे. बिग बॉसमध्ये त्याने अनेकवेळा सांगितले आहे की तो सिंगल आहेत आणि कोणाची तरी वाट पाहत आहे. त्यामुळेच त्याच्या लव्ह लाईफबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

शिव ठाकरे टीव्ही अभिनेत्री आकांक्षा पुरीला डेट करत असल्याचे बोलले जात आहे. दोघेही बऱ्याच कार्यक्रमांमध्ये एकत्र स्पॉट झाले आहेत, त्यानंतर डेटिंगच्या अफवा वार्‍यासारख्या पसरल्या आहे. मात्र या वृत्तावर आता आकांक्षा पुरी हिने नुकताच खुलासा केला आहे. तिने दिलेल्या मुलाखतीत डेटिंगच्या बातम्यांवर प्रतिक्रिया देताना म्हटले की या बातम्या निराधार आहेत. अशा वृत्तांवर मला हसू येते.

तिने शिव ठाकरेविषयी सांगितले की, 'डेटींगच्या बातम्यांमध्ये अजिबात तथ्य नाही'. शिव चांगला खेळतो. तो एक सुंदर आणि चांगला माणूस आहे पण दुर्दैवाने मला चांगली मुले मिळत नाहीत. आता तिच्या या स्टेटमेंटनंतर पुन्हा नवीन चर्चांना उधाण आलं आहे. आकांक्षाच्या या वक्तव्यानंतर चाहते थोडे संभ्रमात पडले आहेत. तिने शिवला काही हिंट दिली आहे का असा सवाल ते करत आहेत. तर दुसरीकडे तिने तिच्या एक्स बॉयफ्रेंडला टोमणा मारला का असंही काहीजण म्हणत आहेत.

टॅग्स :शीव ठाकरे