Join us

'रावण आहे की खिलजी ?' आदिपुरुष सिनेमात होणार 'हा' मोठा बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 20:15 IST

सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील व्हीएफएक्स आणि सैफ अली खानच्या लुक वरुन चांगलीच टर उडवली गेली.

ओम राऊत यांचा आदिपुरुष चित्रपट रिलीजआधीच वादात सापडला आहे. सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील व्हीएफएक्स आणि सैफ अली खानच्या लुक वरुन चांगलीच टर उडवली गेली. रामाच्या चुकीच्या अवतारावरुन तर आदिपुरुष बॉयकॉट अशीच मागणी सुरु झाली. नुकतेच ओम राऊत यांना रिलीजची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. सिनेमाचे आणखी काम राहिले आहे त्यासाठी रिलीज पुढे ढकलत आहोत असे त्यांनी म्हणले. 

सैफच्या लुकमध्ये बदल

आता नव्या माहितीनुसार सिनेमातील सैफ अली खानच्या लुक मध्ये बदल करण्यात येणार आहे. सैफ अली खानचा लुक पाहून नेटकरी चांगलेच भडकले होते. रावणाला कुठे अशी दाढी होती का, रावण नाही तर खिलजी जास्त वाटतोय अशा प्रतिक्रिया आल्या. या वादानंतर आता सैफच्या लुकमधुन दाढी काढण्यात येईल अशी माहिती मिळत आहे. 

३० कोटींचा अतिरिक्त खर्च

आदिपुरुष सिनेमात आता करण्यात येणाऱ्या बदलांमुळे सिनेमाचा खर्च आणखीनच वाढला आहे. आता यासाठी अधिकचे ३० कोटी रुपये खर्च केले जात आहेत. तर हा चित्रपट पुढील वर्षी १६ जुन रोजी प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :आदिपुरूषसैफ अली खान प्रभासक्रिती सनॉन