Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्नील-सई, पूजा-अंकुश या सुपरहिट जोड्यानंतर मराठी इंडस्ट्रीत 'या' जोडीला मिळतेय प्रेक्षकांची पसंती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 19:55 IST

मराठी चित्रपटसृष्टीत अनेक ऑनस्क्रीन जोड्यानी प्रेक्षकांची मन जिंकून घेतली आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीत अनेक ऑनस्क्रीन जोड्यानी प्रेक्षकांची मन जिंकून घेतली आहेत. अनेक जोड्या सुपरहिट ठरल्या तर काही फारशा प्रेक्षकांच्या पसंतीस आल्या नाही. सध्या मराठी चित्रपट सृष्टीत एक जोडी जोरदार चर्चेत आहे ती म्हणजे  शुभंकर तावडे आणि हृता दुर्गुळे यांची. दोघांच्या अभिनयाची चुणूक त्यांनी दाखवून इंडस्ट्रीत स्वतःच्या वेगळ्या बाजू निर्माण केल्या आहेत. त्यांचा नुकताच एक चित्रपट रिलीज झाला.

स्वप्नील जोशी-सई ताम्हणकर,  पूजा सावंत -अंकुश चौधरी यांच्यानंतर मराठी इंडस्ट्रीत शुभंकर-हृता ही जोडी प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. इंडस्ट्रीत असे अनेक नवखे कलाकार आहेत. ज्यांनी स्वतःच्या अनोख्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं आणि असेच शुभंकर आणि हृता आहेत, असं म्हणायला हरकत नाही. 

शुभंकर तावडे हा नवा फॅशन आयकॉन ठरतो आहे. पण सोबतीने अभिनयाच्या जादूने त्याने प्रेक्षकांना आपलंसं करून घेतलं आहे. अभिनयातील नावीन्य आणि लालित्य यातून तो उत्तम अभिनय करून सगळ्यांचा फेवरेट ठरतोय. शुभंकर आणि हृता हे कायम विविध भूमिका साकारून चर्चेत असतात. आता हृता आणि शुंभकर यांची यांची फ्रेश जोडी मराठी प्रेक्षकांना मिळाली आहे.  

टॅग्स :ऋता दूर्गुळेसेलिब्रिटीमराठी अभिनेता