Join us

पुष्पामधील श्रीवल्लीनंतर आता छोटा पडदा गाजवणार महाराष्ट्राची पुष्पवल्ली, जाणून घ्या तिच्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 17:51 IST

अल्लू व रश्मिकाच्या ‘श्रीवल्ली’ (Srivalli Telugu) या गाण्यानं तर वेड लावलं. जगभरात हे गाणं लोकप्रिय झालं. सोशल मीडियावर यावरचे लाखो रिल्स बनलेत.

अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदानाच्या (Rashmika Mandanna) ‘पुष्पा’ (Pushpa: the rise) हा सिनेमा तर सुपरडुपर हिट झालाच, पण सिनेमाची गाणी, डायलॉग्सही गाजलेत. अल्लू व रश्मिकाच्या ‘श्रीवल्ली’ (Srivalli Telugu) या गाण्यानं तर वेड लावलं. जगभरात हे गाणं लोकप्रिय झालं. सोशल मीडियावर यावरचे लाखो रिल्स बनलेत. आता छोट्या पडद्या गाजवायला महाराष्ट्रात पुष्पवल्ली येणार आहे. 

झी मराठीवरील 'तू तेव्हा तशी' या मालिकेतून अभिज्ञा छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत अभिज्ञा प्रेक्षकांना पुष्पावल्लीच्या भूमिकेत दिसणार आहे.

तू तेव्हा तशी या मालिकेबद्दल अभिज्ञा म्हणाली, "सो ऑफिशिअली मी तुम्हाला पुन्हा भेटायला येते आहे एका अशा भूमिकेत जी मला याआधी करायला मिळाली नाही.. मी आशा करते कि प्रेक्षकांकडून मला भरभरून प्रेम आणि पाठिंबा मिळेल, कारण माझी मेहनत १०० पटीने जास्त असणार आहे." आपल्या नवीन भूमिकेबद्दल बोलताना अभिज्ञा म्हणाली, "प्रेक्षकांनी मला आजवर अनेक नकारात्मक भूमिकांमध्ये पाहिलंय आणि माझ्या प्रत्येक भूमिकेवर भरभरून प्रेम केलं. पण तू तेव्हा तशी मधली भूमिका खूपच वेगळी आहे. मी या मालिकेत पुष्पवल्ली नावाची भूमिका निभावतेय. पुष्पवल्लीला पाहताना प्रेक्षकांना नक्कीच मजा येईल याची मला खात्री आहे." 

टॅग्स :अभिज्ञा भावेझी मराठीपुष्पा