Join us

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शहनाज सोबतचे शेवटचे गाणे होणार रिलीज, सिडनाजचे चाहते उत्सुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 19:25 IST

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे वयाच्या ४०व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले.

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने वयाच्या ४०व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्याचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. सिद्धार्थ आणि त्याची कथित गर्लफ्रेंड शहनाज गिल यांनी दोन म्युझिक व्हिडीओत एकत्र काम केले होते आणि या दोन्ही व्हिडीओत त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावली होती. गायक श्रेया घोषाल यांच्या हॅबिट या गाण्याचाही ही जोडी भाग होती, पण हे गाणे अद्याप रिलीज झाले नव्हते. सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल या  जोडीच्या चाहत्यांनी ही जोडी शेवटची वेळ एकत्र पाहण्याची विनंती केली आहे.

म्युझिक व्हिडिओचे BTS फोटो फोटोग्राफरने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या दोघांचे फोटो रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

यासोबतच चाहत्यांनीही हा ट्रॅक लवकरच रिलीज करण्याची मागणी करण्यास सुरुवात केली आहे. या बीटीएसमध्ये सिद्धार्थ शुक्ला आणि शेहनाज गिल निळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये स्पष्ट पोज देताना दिसत आहेत.

एका फोटोमध्ये अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल एक बीचवर एकत्र टाइम स्पेंड करताना दिसत आहेत.  एका फोटोमध्ये दोघेही सन बाथ घेताना दिसत आहेत.

या सर्व फोटोंमध्ये शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांचे दमदार लूक पाहायाला मिळतोय. त्यात दोघांची केमिस्ट्री पाहून चाहते भावुक झाले आहेत आणि ते या गाण्याच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत.

टॅग्स :सिद्धार्थ शुक्लाशेहनाझ गिल