Join us
Daily Top 2Weekly Top 5

शशांक केतकरच्या तक्रारीनंतर BMC ची तातडीने कारवाई, स्वच्छ केला परिसर; अभिनेता म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 16:59 IST

गोरेगावच्या फिल्मसिटीजवळच रस्त्यावर कचऱ्याचा ढीग असलेला फोटो शेअर करत त्याने मुंबई पालिकेला चांगलेच खडेबोल सुनावले होते.

अभिनेता शशांक केतकरने (Shashank Ketkar)  काल एक संतापजनक पोस्ट शेअर केली होती. गोरेगावच्या फिल्मसिटीजवळच रस्त्यावर कचऱ्याचा ढीग असलेला फोटो शेअर करत त्याने मुंबई पालिकेला चांगलेच खडेबोल सुनावले होते. आता पालिकेने याची दखल घेतली असून 24 तासात तो परिसर स्वच्छ केला आहे. शशांक केतकरला टॅग करत पालिकेने सोशल मीडियावर तसे फोटोही शेअर केले. यावर शशांकने पालिकेचे आभार मानले आहेत.

बीएमसी(BMC)ने दखल घेतल्यानंतर शशांक केतकरने लिहिले, "पालिकेने तातडीने कारवाई केली यासाठी मनापासून आभारी आहे. आता पुन्हा तिथे कचरा जमणार नाही या साठी काहीतरी ठोस पावलं उचला!! आणि फक्त तो परिसर नाही तर पूर्ण मुंबई स्वच्छ ठेवूया. पालिकेइतकीच नागरिकांचीही ही जबाबदारी आहे."

बीएमसीने स्वच्छ केलेल्या परिसराचे फोटो शेअर करत शशांकला टॅग करत लिहिले, 'सदर ठिकाणी काल स्वच्छता करण्यात आली आहे. धन्यवाद!'

बीएमसीच्या या पोस्टवर नागरिकांनी मात्र काहीशी नाराजी बोलून दाखवली आहे. सेलिब्रिटीने सांगितल्यावरच पालिका अॅक्शन घेणार का, त्यांनाच प्राधान्य देणार का असे प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केले आहेत. तरी काही का असेना शशांकच्या तक्रारीनंतर अखेर तो कचऱ्याचा ढीग उचलला गेला आहे. 

टॅग्स :शशांक केतकरमुंबईमराठी अभिनेता