Join us
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या लग्नातून विभक्त झाल्यानंतर अभिज्ञा भावे पडली या व्यक्तीच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 12:21 IST

'तुला पाहते रे' फेम अभिज्ञा भावे हिने सोशल मीडियावर ती ज्या व्यक्तीच्या प्रेमात आहे त्याच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. 

तुला पाहते रे मालिकेतील मायराच्या भूमिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अभिज्ञा भावे सोशल मीडियावर सक्रीय आहे. सोशल मीडियावर ती फोटो व व्हिडिओ शेअर करत असते आणि बऱ्याचदा ती फोटोंमुळे चर्चेत येत असते. मात्र नुकताच तिने एक फोटो शेअर केला आहे. तिचा या फोटोची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा होताना दिसत आहे. त्याला कारणही तसे खासच आहे. ती ज्या व्यक्तीच्या प्रेमात आहे त्याच्यासोबतचा फोटो तिने शेअर केला आहे.

अभिनेत्री अभिज्ञा भावेने फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ती मेहूल पैच्या प्रेमात असून त्याच्यासोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत तिने हार्ट असं कॅप्शन दिले आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

मेहुल पै मुळचा मुंबईचा असून गेल्या १२ वर्षांपासून ‘क्लॉकवर्क्स इव्हेंटस प्रायव्हेट लिमिटेड’मध्ये तो ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. यातून इव्हेंट मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट, फायनान्शियल प्लॅनिंगची जबाबदारी तो सांभाळतो आहे.

फार कमी लोकांना माहित आहे की चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अभिज्ञा एअरहॉस्टेस होती. २०१० साली ‘प्यार की ये एक कहाणी’ या हिंदी मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.

२०१४ साली ती वरूण वैटिकर यांच्यासोबत विवाहबद्ध झाली होती. मात्र काही कारणास्तव नंतर ती विभक्त झाली.

टॅग्स :अभिज्ञा भावेतुला पाहते रे