निर्माता, दिग्दर्शक राजकुमार हिराणी व संजय दत्त यांची मैत्री जुनी आहे. येत्या वर्षांत तर ही मैत्री आणखी बहरणार आहे. होय, संजय दत्तच्या आयुष्यावर चित्रपट काढल्यानंतर राजकुमार हिराणी पुन्हा एकदा संजयसोबत काम करणार आहेत. सूत्रांचे मानाल तर राजकुमार हिराणी सध्या ‘मुन्नाभाई’ या सुपरडुपर हिट फ्रेन्चाईजीच्या तिस-या भागावर काम करत आहेत आणि या चित्रपटात मुन्ना-सर्किट अर्थात संजय दत्त आणि अर्शद वारसी या दोघांचे नाव फायनल करण्यात आले आहे. या दोघांना वगळता चित्रपटातील अन्य स्टारकास्ट नवी असणार आहे.हिराणी स्क्रिप्टवर सर्वाधिक मेहनत घेतात. ‘मुन्नाभाई’च्या स्क्रिप्टवरही ते मेहनत घेत आहेत. स्क्रिप्ट तयार आहे आणि २०१९ च्या अखेरपर्यंत या चित्रपटाचे शूटींग सुरू होईल, असे कळतेय. अर्थात या चित्रपटाची कथा काय असेल, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
फायनल! पुन्हा येणार मुन्ना-सर्किटची जोडी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 15:15 IST
निर्माता, दिग्दर्शक राजकुमार हिराणी व संजय दत्त यांची मैत्री जुनी आहे. येत्या वर्षांत तर ही मैत्री आणखी बहरणार आहे. होय, संजय दत्तच्या आयुष्यावर चित्रपट काढल्यानंतर राजकुमार हिराणी पुन्हा एकदा संजयसोबत काम करणार आहेत.
फायनल! पुन्हा येणार मुन्ना-सर्किटची जोडी!!
ठळक मुद्दे‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर जोरदार कमाई केली होती. या दोन्ही चित्रपटातील संजय दत्त आणि अर्शद वारसीच्या अभिनयाचे सगळ्यांनी कौतुक केले होते. या चित्रपटातील संजय आणि अर्शदची केमिस्ट्री खूपच गाजली होती.