Join us
Daily Top 2Weekly Top 5

राजपाल यादवची तुरुंगातून सुटका पण अमीषा पटेल अडचणीत, अभिनेत्रीविरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 17:04 IST

राजपालने दीड कोटींची रक्कम जमा केल्यानंतर त्याला जामीन मंजूर झाला आहे. तुरुंगातून बाहेर पडण्याचा राजपाल यादवचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र आता बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलच्या अडचणी वाढल्या आहेत. 

बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. ९ कोटी चेक बाऊन्सप्रकरणी राजपालने तिहार तुरुंगात सरेंडर केलं होतं. त्यानंतर न्यायालयाने त्याचा जामीन अर्जही फेटाळला होता. अखेर आज राजपाल यादवला न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. राजपालला कोर्टाने दोन तासांत दीड कोटी भरा असा सक्त आदेश दिला होता. त्यानंतर राजपालने दीड कोटींची रक्कम जमा केल्यानंतर त्याला जामीन मंजूर झाला आहे. तुरुंगातून बाहेर पडण्याचा राजपाल यादवचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र आता बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलच्या अडचणी वाढल्या आहेत. 

अमीषा पटेल विरोधात मुरादाबाद न्यायालयाने अजामीनपत्र वॉरंट जारी केलं आहे. वारंवार समन्स पाठवूनही सुनावणीसाठी न्यायालयात हजर न राहिल्याने सोमवारी कोर्टाने अमीषा पटेलविरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी केलं आहे. अमीषाला १० वर्ष जुन्या खटल्याच्या सुनावणीसाठी २७ मार्चला कोर्टात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. २०१७ मध्ये एका इव्हेंट कंपनीकडून दाखल केल्या गेलेल्या खटल्याबाबत ही सुनावणी होणार आहे. 

नेमकं प्रकरण काय?

२०१७ मध्ये अमीषा पटेलने मुरादाबाद येथील एका लग्नाच्या इव्हेंटमध्ये डान्स करण्यासाठी ११ लाख रुपये घेतले होते. पण, मानधन घेऊनही अमीषा पटेल या लग्नात डान्स करण्यासाठी उपस्थित राहिली नाही. त्यानंतर इव्हेंट मॅनेजर पवन वर्मा यांनी मुरादाबाद पोलिसांत अभिनेत्रीविरोधात तक्रार दाखल केली होती. मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार,अमीषा इव्हेंटमध्ये येण्यासाठी मुंबईहून दिल्लीला आली होती. मात्र तिने दिल्लीला येताच अतिरिक्त दोन लाख रुपये कॅशची मागणी केली. इव्हेंट कंपनी तिची मागणी पूर्ण करण्यास नकार देताच अभिनेत्री पुन्हा मुंबईला निघून गेली. याप्रकरणी अभिनेत्रीविरोधात १२० बी, ४०६, ५०४ आणि ५०६ या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी अमीषाने मुरादाबाद येथे येऊन जामीन मिळवला होता. मात्र त्यानंतर तिने कोर्टाच्या आदेशांचं पालन न केल्याने आता तिच्याविरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी केलं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rajpal Yadav released, Amisha Patel in trouble: Warrant issued

Web Summary : Rajpal Yadav got bail in check bounce case. Amisha Patel faces non-bailable warrant for failing to appear in court regarding a 2017 event dispute where she allegedly took money but didn't perform.
टॅग्स :राजपाल यादवअमिषा पटेल