बॉलिवूड अभिनेत्री मुमताज पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. पुन्हा एकदा त्यांच्या निधनाची अफवा सगळीकडे पसरत आहे. मागील वर्षीदेखील मे महिन्यातच मुमताज यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली होती. यावेळी पंजाबच्या एका मंत्र्यांनी मुमताज यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मात्र एका वेबसाईटच्या रिपोर्ट नुसार त्यांनी मुमताज यांच्या कुटुंबाशी संपर्क साधला असता त्या एकदम व्यवस्थित असल्याचे समजलेगेल्या वर्षी याच महिन्यात त्यांच्या निधनाची अफवा पसरली होती. या बातमीने सगळ्यांना धक्का बसला होता ही अफवा मे महिन्यात पसरली होती. आता यावर्षी देखील याच महिन्यात त्यांच्या निधनाचे वृत्त वाऱ्यासारखे पसरत आहे मुख्य म्हणजे हा गैरसमज पंजाबचे क्रिडा मंत्री राणा गुरमित एस सोढी यांच्या ट्विटनंतर पसरला.
अभिनेत्री मुमताज यांना जिवंतपणीच वाहिली श्रद्धांजली, पंजाबच्या मंत्र्यांच्या ट्विटनंतर व्हायरल झाली बातमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 18:40 IST