Join us

'जुग जुग जियो' चित्रपटावर कोरोनाचे सावट, नीतू कपूर, वरूण धवननंतर मनीष पॉलला कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 16:28 IST

'जुग जुग जियो' चित्रपटातील वरूण धवन, नीतू कपूर यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता मनीष पॉलला कोरोनाची लागण झाल्याचे समजते आहे.  

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि कियारा आडवाणी 'जुग-जुग जियो' चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटाच्या अडचणीत आता  वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी वृत्त आले होते की, वरुण धवन, नीतू कपूर यांना कोरोना झाला आहे. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शक राज मेहता यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे चित्रपटाचे शूटिंग थांबले होते. आता अशी माहिती समोर येते आहे की, अभिनेता मनीष पॉललाही कोरोना झाल्याचे समोर आले आहे.कोरोनाचा रिपोर्ट हाती आल्यानंतर मनीष पॉल शूटिंगचे लोकेशन सोडून मुंबईत आला आहे. त्याने मुंबईतील घरी स्वत:ला क्वारंटाईन केले आहे. सध्या मनीष पॉल किंवा त्याच्या टीमकडून याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

तर दुसरीकडे तनाज इराणी या छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीला कोरोना झाल्याचे समजते आहे.ही माहिती तिने इंस्टाग्रामवर दिली आहे.

तनाजने इंस्टाग्रामवर लिहीले आहे की, माझे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. मी देवाकडे प्रार्थना करेन की माझ्यासोबतच्या इतर कोणालाही कोरोनाची लागण झाली नसू दे. कोरोना झाल्यावरही ती सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करत आहे.

सिनेइंडस्ट्री कोरोनाच्या जाळ्यात अडकली आहे. एकाच दिवशी दोन कलाकारांचे कोरानाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री दिव्या भटनागरचे निधन झाले आहे.

 

टॅग्स :मनीष पॉलवरूण धवननितू सिंग