Join us

'मिर्झापूर'च्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी, तिसऱ्या सीझनचीही सुरू आहे तयारी!

By अमित इंगोले | Updated: October 24, 2020 15:18 IST

आधीच ही सीरीज भारतात सर्वात जास्त बघितली गेलेली सीरीज ठरली आहे. अशात आता या सीरीजचे फॅन्स या वेबसीरीजच्या तिसऱ्या सीझनचीही आतुरतेने वाट बघतील. 

नुकताच 'मिर्झापूर' वेबसीरीजचा दुसरा सीझन रिलीज करण्यात आला. सोशल मीडियावर सगळीकडे याचीच चर्चा सुरू आहे. प्रेक्षकांचा या सीरीजला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आता अशी माहिती समोर आली आहे की, या सुपरहिट वेबसीरीजचा तिसरा सीझनही आणण्याची तयारी केली जात आहे. आधीच ही सीरीज भारतात सर्वात जास्त बघितली गेलेली सीरीज ठरली आहे. अशात आता या सीरीजचे फॅन्स या वेबसीरीजच्या तिसऱ्या सीझनचीही आतुरतेने वाट बघतील. 

बॉलिवूड हंगामाच्या एका रिपोर्टनुसार, अ‍ॅमेझॉन प्राइमच्या काही सूत्रांनी सांगितले की, 'मिर्झापूर' च्या तिसऱ्या सीझनची तयारी सुरू आहे. असे समजले आहे की, पहिल्या सीझनच्या तुलनेत मिर्झापूरच्या दुसऱ्या सीझनचं बजेट दुप्पटीपेक्षा जास्त होतं. तसेच कलाकारांनाही दुप्पट मानधन देण्यात आलं. पहिल्या सीझनपासूनच पंकज त्रिपाठी, अली फजल आणि दिव्येंदु शर्माच्या भूमिका कालीन भैया, गुड्डू पंडीत आणि मुन्ना कोणत्याही मोठ्या अ‍ॅक्शन सिनेमातील हिरोजपेक्षा कमी पॉप्युलर नाही. त्यामुळे त्यांना मोठं मानधन दिलं जाणं साहजिक आहे.

सूत्रांनी सांगितलं की, मिर्झापूरच्या पहिल्या सीझनचं बजेट केवळ १२ कोटी रूपये होतं. तर दुसऱ्या सीझनचं बजेट ६० कोटीच्या आसपास होतं. असे मानले जात आहे की, तिसऱ्या सीझनच्या बजेटमध्येही ३० टक्क्यांनी वाढ होऊ शकते. अशात जर तुम्ही 'मिर्झापूर' सीरीजचे फॅन असाल तर तुम्हालाही तिसऱ्या सीझनची उत्सुकता राहणारच. 

टॅग्स :मिर्झापूर वेबसीरिजवेबसीरिजपंकज त्रिपाठीअली फजल